Mumbai Crime sakal
मुंबई

Mumbai Crime News : ब्लेडने बॅग कापून माल चोरणारी महिला गजाआड

सराईत महिला चोरावर 5 गुन्हे दाखल mumbai dombivli crime cutting bag with blade woman thief steals arrested

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवली स्टेशन परिसरातील गर्दीचा फायदा घेत ती महिलांच्या हातातील बॅग, पर्सवर ब्लेड मारुन कापायची. बॅग, पर्समधील मौल्यवान साहित्य, रोख रक्कम असे साहित्य ती लंपास करत असे. भाजी मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका महिलेची पिशवी ब्लेडने कापून त्यातील 35 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र तीने चोरले.

ही चोरीची घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सीसीटिव्हीच्या आधारे महिलेचा शोध घेत तिला अटक केली आहे. सुवर्णा गायकवाड असे अटक महिला आरोपीचे नाव असून ती सराईत गुन्हेगार आहे. तिच्यावर आत्तापर्यंत 5 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

डोंबिवली स्टेशन परिसर हा नेहमीच गर्दीने फुललेला असतो. याच गर्दीचा फायदा घेत सुवर्णा ही आपला हात साफ करायची. महिलांवर नजर ठेवून ती आपले सावज हेरायची. गर्दीत त्यांच्या आजूबाजूलाच राहून त्यांच्या पिशवीवर, पर्सवर ब्लेड मारायची आणि मोठ्या हातचालाखीने पर्समधील मौल्यवान वस्तू चोरायची.

Mumbai Crime

30 जुलैला स्टेशन परिसरात फिर्यादी महिला या भाजीपाला खरेदीसाठी गेल्या होत्या. सायंकाळी 5.30 च्या सुमारास फिर्यादी या कैलास लस्सी दुकाना समोरुन जात असताना एका महिलेने त्यांच्या पिशवीवर ब्लेड मारुन पिशवीतील 35 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरुन नेले. फिर्यादी यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. स्टेशन परिसरातील सीसीटिव्ही तपासले असता आरोपी महिला सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. पोलिसांनी तिचा शोध घेत तिला अटक केली आहे.

सुवर्णा गायकवाड असे अटक महिलेचे नाव असून तिच्या विरोधात असेच आणखी 5 गुन्हे दाखल असल्याची माहिती रामनगर पोलिसांनी दिली. त्यामुळे पुढील तपासात आणखीन काही नव्या गोष्टी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता गर्दीच्या परिसरात वावरताना महिला चोरांपासून सावधान राहा असं सांगण्याची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT