डोंबिवली sakal
मुंबई

Mumbai : आलोच आहोत तर कारवाई करु...आरटीओटी डोंबिवलीतील रिक्षांवर कारवाई

आरटीओ अधिकारी सोमवारी डोंबिवलीत आले होते, त्यांनी अचानक रिक्षाचालकांविरओधात कारवाई करण्यास सुरुवात केल्याने अनेक रिक्षाचालकांनी स्टेशन

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवली शहरातील स्टेशन परिसर हा रिक्षाचालकांनी व्यापलेला असतो. रिक्षाचालकांच्या कोंडीतून वाट काढताना प्रवाशांना नाकी नऊ येतात. परंतु सोमवारी सायंकाळी इंदिरा चौकात मात्र शुकशुकाट पाहायला मिळत होता. चौकातील हा शुकशुकाट पाहून रिक्षावाले गेले तरी कोठे असा प्रश्न प्रत्येक प्रवाशाला पडत होता.

आरटीओ अधिकारी सोमवारी डोंबिवलीत आले होते, त्यांनी अचानक रिक्षाचालकांविरओधात कारवाई करण्यास सुरुवात केल्याने अनेक रिक्षाचालकांनी स्टेशन परिसरातून चलान कापले जाऊ नये म्हणून धूम ठोकली होती. प्रवाशांच्या तक्रारींची दखल न घेणारे आरटीओ प्रशासन एका बैठकीसाठी शहरात आले होते. आता आलोच आहोत तर कारवाई करु असाच काहीसा पवित्रा आरटीओ कर्मचाऱ्यांचा दिसून आल्याची चर्चा प्रवासी करत होते.

डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरिवाले हटले असले तरी रिक्षाचालकांमुळे आजही वाहतूक कोंडीची समस्या ही उद्भवत असल्याची तक्रार प्रवासी करत आहेत. स्टेशन परिसरात बिनधास्त रिक्षाचालक कोठेही आपली रिक्षा थांबवून भाडे आकारत असून त्यांच्या या मनमानीमुळे इतर वाहनचालक, प्रवासी सर्वांनाच त्रास होतो.

रिक्षाचालकांची मनमानी विषयी प्रवासी संघटना, सर्वसामान्य प्रवासी यांनी वारंवार तक्रार करुनही त्याकडे आरटीओ प्रशासन कारवाई करत नसल्याची तक्रार देखील प्रवासी करतात. कोरोना कालखंडानंतर रिक्षाचालकांनी मनमानी पद्धतीने भाडे वाढ केलेली आहे. याविषयी वारंवार तक्रार करुन, आवाज उठवून त्यास आरटीओकडून ठोस उपाययोजना झालेली नसल्याने आजही रिक्षाचालक वाढीव भाडे आकारत आहेत. तसेच भाडे नाकारणे, मीटर पद्धत न वापरणे यासोबतच वाहतूकीच्या अनेक नियमांचे उल्लंघन करत रिक्षाचालक आज वाहतूक करत असल्याचे उघड आहे.

स्टेशन परिसरातील फेरिवाले हटल्यानंतर येथील रिक्षा थांब्यांना योग्य जागा, मीटर पद्धतीने रिक्षांना थांबा अशा जागांची पाहणी करण्यासाठी आरटीओचे काही अधिकारी सोमवारी डोंबिवलीत आले होते. ही बैठक संपल्यानंतर रामनगर पोलिस ठाणे, इंदिरा चौक, फडके रोड आदि परिसरात आरटीओ अधिकाऱ्यांनी अचानक भेट देत बेशिस्त रिक्षाचालकांवर, नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली.

एका रिक्षाचालकाला चक्क 2 हजाराच्या आसपास दंड आरटीओ अधिकाऱ्यांकडून ठोठावण्यात आला आहे. आरटीओची ही कारवाई पाहताच इतर रिक्षाचालकांनी इंदिरा चौकातून थूम ठोकली. चौकात रिक्षा मिळत नसल्याने प्रवाशांच्या मोठ्या रांगा परिसरात लागल्या होत्या.

घरी जाण्यासाठी वाहन मिळत नसल्याने प्रवासी काहीसे संतापले होते. जेव्हा तक्रार केली जाते त्या रिक्षाचालकावर काय कारवाई होते ? हे माहित पडत नाही. परंतू आज डोंबिवलीत आल्यानंतर यांना येथील रिक्षाचालक नियम मोडत असल्याची बाब अधिकाऱ्यांच्या लक्षात आली आहे का ? येथे आले म्हणून कारवाई केली नाही तर असेच रोज सुरु असते.

दिव्या भोसले, प्रवासी

राजकीय दबाव आल्यानंतर आरटीओ कामाला लागते, प्रवाशांसाठी ते काही करताना दिसत नाही. तोंड दिखावा कारवाई त्यांची असल्याने आरटीओ आहे की नाही असा प्रश्न येथील प्रवाशांना पडला आहे. एका पक्षाचा दबाव पडल्याने ते डोंबिवलीत पाहणी करण्यासाठी आले आणि कारवाई देखील करायला लागले. परंतू इतर वेळेस हे चित्र दिसत नाही. आरटीओकडून काही काम होताना दिसत नसल्याने त्यांनी सरळ सांगावे की कल्याण डोंबिवलीसाठी आम्ही नाहीच आहोत.

सचिन गवळी, पाम प्रवासी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Relations : तब्बल ३ वर्षांनी पाकिस्तानी मंत्री भारतात येणार! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदाच मोठी घडामोड; दिल्लीत नेमकं काय घडतंय?

Zapatlela Untold Story : 'तात्या विंचू' लंडनला कसा पोहोचला? सुपरहिट मराठी सिनेमाचं आणि शरद पवारांचं 'ते' खास कनेक्शन आलं समोर!

Latest Marathi News Live Update: जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Election Commission: उत्तर प्रदेश, पंजाबसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार? काय आहे अपडेट?

Kartiki Ekadashi 2026 : विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी! पंढरपूरच्या विठुरायाचे २४ तास दर्शन सुरू; 'या' वेळेस फक्त काही मिनिटेच मिळणार दर्शन!

SCROLL FOR NEXT