आंदोलन sakal
मुंबई

Mumbai : घंटानाद, थाळीनाद करत डोंबिवलीकरांचे आंदोलन

रस्त्यांवर आक्रमक होत डोंबिवलीकर उतरला रस्त्यावर

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : रस्त्यांची दुरावस्था, पाणी समस्या, वाहतूक कोंडी यांसारख्या अनेक समस्यांनी बेजार झालेल्या डोंबिवलीकरांनी गुरुवारी रात्री रस्त्यावर उतरत घंटानाद, थाळीनाद करत आंदोलन केले. या आंदोलनात ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुले देखील सहभागी झाल्याचे पहायला मिळाले. आम्ही समस्यांनी हैराण झालो आहोत आता यापुढे आम्ही हे सहन करणार नाही असे म्हणत प्रशासनाचा निषेध यावेळी नागरिकांनी व्यक्त केला. काही भागात नागरिकांनी 8 वाजता 5 मिनिटांसाठी घरातील दुकानातील लाईट बंद करत या आंदोलनाला पाठिंबा दिला.

कल्याण डोंबिवली मधील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. डोंबिवलीतील सर्वसामान्य जनतेने याविषयी आंदोलन करत रस्त्यावर उतरत आंदोलन केली. राजकारणी मंडळी आपली पोळी भाजून घेत नंतर थंड झाले व सामान्यांची समस्या तशीच राहिली. अखेर सर्वसामान्य नागरिकांनीच एकजूट होत आंदोलनाचे हत्यार उपसले. याविषयीचे संदेश गेल्या अनेक दिवसांपासून समाज माध्यमावर व्हायरल करत नागरिक जागृती करत होते. गुरुवारी रात्री 8 च्या दरम्यान नागरिकांनी डोंबिवली पूर्वेतील अप्पा दातार चौकात एकत्र येत घंटानाद व थाळीनाद करत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध नोंदवला. यावेळी विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी देखील यात सहभागी झाल्याचे पहायला मिळाले.

आंदोलन अधिक चिघळू नये म्हणून स्थानिक पोलीस साध्या वेशात परिसरात फिरून आंदोलन कर्त्यांवर लक्ष ठेवून होते.

ब्लॅक आऊटला अल्प प्रतिसाद

शहरातील मोजके दुकानदार, काही सोसायटी वगळता ब्लॅक आऊट झाल्याचे पहायला मिळाले नाही. घंटानाद, थाळीनाद आंदोलन नागरिकांनी केले तरी त्यांना इतर नागरिकांचा फारसा प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले नाही. हे अराजकीय आंदोलन असले तरी आंदोलन स्थळाच्या जवळ असलेल्या मनसे कार्यालयातील कार्यकर्त्यांनी सर्व सामान्य नागरिकांना पाठिंबा दिल्याचे दिसून आले, त्यांनी आपल्या कार्यालयातील दिवे बंद केल्याचे दिसून आले.

बेशिस्त तरुणाची पत्रकारांशी हुज्जत

नागरिक म्हणून समस्यांवर वाचा फोडण्याची स्वतःची काही जबाबदारी असताना अचानक एका तरुणाने पत्रकारांशी हुज्जत घातली.

डोंबिवलीतील जे खराब रस्ते आहेत अनेक वर्षापासून आम्ही खराब रस्त्यांना सहन करीत आहोत पण आता आमचे सहनशीलता संपली आहे चांगले रस्ते मिळावे यासाठी आम्ही आज येथे एकत्र जमलो आहोत दोन टप्प्यात हे आंदोलन केले जाणार आहेत आज पाच मिनिटांसाठी लाईट घालवून घंटानात करून आम्ही प्रशासनाचा निषेध केला दुसऱ्या टप्प्यामध्ये केडीएमसी आम्हाला सुख सोयी सुविधा देण्यात अपयशी ठरली आहे याची तक्रार पंतप्रधान कार्यालयात पत्रव्यवहार करून केली आहे. गेल्या दोन तीन दिवसांत 400 ई-मेल पंतप्रधान कार्यालयात गेले असून त्याची दखल घेण्यात आली आहे.

अक्षय फाटक, नागरिक दक्ष नागरिक मंच

हा तरुण वर्ग आज रस्त्यावर उतरला आहे, ही एक आशादायक अशी गोष्ट आहे. आणि अशाप्रकारे बिगर राजकीय आंदोलन नागरिकांचा नागरिकांसाठी उभे राहतं तेव्हा खरोखर नागरी समस्या सोडविल्या जातील असे वाटते.

उदय कर्वे, जागरूक नागरिक डोंबिवली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: अजित पवार यांनी दिल्लीत घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट

Ayushman Bharat : अलर्ट! 5 लाखपर्यंतचे मोफत उपचार होतील बंद; आयुष्मान कार्ड असल्यास अजिबात करू नका 'ही' 1 चूक, मिळणार नाही कोणतीच सुविधा

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली! 15 षटकार अन् 11 चौकरांसह आशिया कपमध्ये शतकी झंझावात

Nilam Gorhe : डॉ. नीलम गोऱ्हे ॲक्शन मोडमध्ये; गडकरी आणि मुख्यमंत्र्यांकडे केली 'या' १० महत्त्वाच्या उपाययोजनांची मागणी

Pune Navale Bridge Accident : 'रोड इंजिनिअरिंग'च्या चुका आणि प्रशासनाचे दुर्लक्षच ठरले 'मृत्यूचा सापळा'

SCROLL FOR NEXT