Mumbai  
मुंबई

Mumbai : एकट्याने बोलण्याची हिंमत नाही का? उपमुख्याध्यापिकेने दिला भाजप आमदाराला दम

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - उल्हासनगरच्या न्यू इंग्लिश हायस्कूल शाळेने यावर्षी ३ पट फी वाढ केल्याने पालक वर्ग चिंतेत आहे. त्यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे याची तक्रार केल्यानंतर आमदार गायकवाड यांनी या शाळेच्या प्रशासनाची भेट घेत त्यांना याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र शाळेत गेलेल्या आमदारांना उपमुख्याध्यापिकांनी तुमच्यात हिंमत नाही का एकट्याने बोलण्याची असा दम दिला. आमदार आणि उपमुख्याध्यापिकांमध्ये झालेल्या वादाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मंगळवारचा हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे.

या वेळेत आमदार गायकवाड यांच्या सोबत काही पालक उपस्थित होते,यावेळी शाळेच्या उपमुख्याध्यापिकां यांनी तुमच्या सोबत आलेल्यांना बाहेर पाठवा, तुमच्या एकट्यामध्ये बोलण्याची हिंमत नाही का असा दम चक्क भाजपा आमदारांनाच दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी या उप मुख्याध्यापिकेला चांगलंच धारेवर धरत खडसावलं.

यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून हे प्रकरण शांत केलं. दरम्यान एका लोकप्रतिनिधींशी शाळा प्रशासन अशा प्रकारे वागत असेल तर पालक वर्गाशी ते कसे बोलत असतील याचा विचार करा असा सवाल आमदार गणपत गायकवाड यांनी उपस्थित केलाय.दरम्यान हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करणार असून शाळा प्रशासनाने अयोग्य पद्धतीने फी वाढ केल्याचं आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितलं.

चार तास लागले

या घटनेची सूचना मिळताच वडाळा, रावली कॅम्प, देवनार, धारावी या विभागातील अग्निशामक दल तात्काळ घटना स्थळी दाखल झाले आहेत.अग्निशमन दलाने चार तासात ही वाहने खड्डातून बाहेर काढले. यासाठी क्रेन मशीनचा वापर करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW: स्मृती मानधना - प्रतिका रावल ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'हा' पराक्रम करणारी जगातील पहिली जोडी; ५२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

बकरी ईदला आम्ही ज्ञान पाजळत नाही, तुम्ही फटाक्यांवर बोलू नका; दिवाळीआधी धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

Photos : जस्टिन ट्रुडो 'या' सिक्रेट गायिकेला किस करतानाचा फोटो व्हायरल; अर्धनग्न अवस्थेत मिठीत घेताना दिसले कॅनडाचे माजी पंतप्रधान

Pune : पाषाणमध्ये नदीत वाहून आला मृतदेह, ५-६ दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याची शक्यता; हत्या की आत्महत्या?

School Fee: आता युपीआयद्वारे एका क्लिकवर शाळेची फी जमा करता येणार! केंद्र सरकारचे मोठे पाऊल, आदेशाचे पत्र जारी

SCROLL FOR NEXT