Legislature esakal
मुंबई

Mumbai : अधिवेशन चहापान पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेता कोण ?

कॉंग्रेसमध्ये खलबते सुरु राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कॉंग्रेसकडे जास्त जागा असल्याने त्यांचा विरोधी पक्षनेता असे सांगलीत नमूद केले आहे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेचा विरोधी पक्षनेता असणारे अजितदादा पवार पावसाळी अधिवेशनात थेट उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने राज्याच्या इतिहासात बहुधा प्रथमच चहापानाला आमंत्रित करायचे तरी कुणाला असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि महाविकास आघाडी सत्ताधारी आघाडीला विरोध करण्यास सज्ज झाली असली तरी सभेतला विरोधी नेता उद्या ता १६ रोजी तरी निवडला जाणार काय याबद्दल कुतुहल आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कॉंग्रेसकडे जास्त जागा असल्याने त्यांचा विरोधी पक्षनेता असे सांगलीत नमूद केले आहे.मात्र महाराष्ट्रात ही जबाबदारी कुणाला द्यायची याबद्दल अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.कॉंग्रेसमधील काही आमदार अस्वस्थ असून ते ऐनवेळी काही वेगळे वागतील असे निरोप वारंवार श्रेष्ठींपर्यंत धडकत आहेत.

त्यामुळे विरोधीपक्षनेता ही जबाबदारी सोपवताना अत्यंत सावध पावले टाकावी लागणार आहेत.एकनाथ शिंदे ,राधाकृष्ण विखे पाटील आणि आता अजितदादा पवार असे विधानसभेतील विरोधीपक्षनेते भाजपने गळाला लावले.

आता कॉंग्रेस अत्यंत ताकदीनिशी लोकसभा निवडणुकीच्या राजकारणात उतरत असताना कोणताही धोका पत्करायचा नाही असे पक्षाचे धोरण आहे.पक्षातील काही आमदारांच्या मनात काळेबेरे आहे काय हे बघण्याची जबाबदारीही काही ज्येष्ठांवर सोपवण्यात आली आहे तर काही जण ती स्वत:हूनच पार पाडत आहेत.

अशोक चव्हाण ,पृथ्वीराज चव्हाण ,य़शोमती यांची नावे चर्चेत

दरम्यान विरोधी पक्षनेतेपदासाठी कुणाचे नाव योग्य राहील याची चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी दिल्लीतील काही प्रमुख नेत्यांनी चर्चा केल्याचे समजते.माजी मुख्यमंत्री व्दय अशोक चव्हाण ,पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचा विचार सुरु आहे.

नव्या दमाच्या नेत्याला हे पद देणे योग्य ठरेल या निकषावर नागपूर जिल्ह्यातील राजकारणात गडकरी फडणवीसांना विरोध करणारे सुनील केदार आणि अमरावती जिल्ह्याच्या राजकारणावर पकड असलेल्या यशोमती ठाकूर यांच्या नावांचाही विचार केला जावू शकेल असे समजते.

विजय वडेट्टीवार ,कुणाल पाटील अन पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणात भूमिका निभावू शकणार्या विश्वजित कदम आणि संग्राम थोपटे ,उत्तर महाराष्ट्रातील कुणाल पाटील अशी सर्वच नावे विचारात घेतली जात आहेत.महिलेला संधी या निकषावर यशोमती यांना झुकते माप मिळण्याची शक्यता आहे.

त्या राहुल गांधी यांच्या विश्वासातल्या नेत्या आहेत.पश्चिम महाराष्ट्राऐवजी विदर्भ मराठवाडयात जागा वाढण्याची शक्यता लक्षात घेता तेथील नेत्यांना संधी देण्यास प्राधान्य दिले जाण्याचीही चर्चा आहे.विलासरावांचे पुत्र अमित देशमुख यांचेही नाव विचारात येवू शकेल असेही सांगितले जाते आहे.अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला याबद्दलचा निर्णय घेतला जाईल असे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT