electricity sakal
मुंबई

Electricity : मुंबईची आजची वीजमागणी सर्वकालिक उच्चांकी; किती ते वाचाच!

अत्यंत कडक उन्हाळ्यामुळे एसी, कूलर, पंखे, फ्रीज आदींचा वापर वाढला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - अत्यंत कडक उन्हाळ्यामुळे एसी, कूलर, पंखे, फ्रीज आदींचा वापर वाढलेला असल्याने आज दुपारी साडेतीन वाजता मुंबईत ३,९६८ मेगावॉट अशी सर्वकालिक उच्चांकी विजेची मागणी नोंदविण्यात आली. यापूर्वी मुंबईत केव्हाही एवढी मागणी नोंदविण्यात आली नव्हती.

मुंबईला अदाणी इलेक्ट्रिसिटी, बेस्ट व टाटा पॉवर या तीन वीजनिर्मिती कंपन्या वीज पुरवतात तर भांडूपपासून पुढे महावितरणतर्फे वीजपुरवठा होतो. सध्या कडक उन्हाळा सर्वांनाच भाजून काढत असल्याने वातानुकूल यंत्रे, पंखे, फ्रीज यांचा वापरही कमाल पातळीवर गेला आहे. त्यामुळे आज दुपारी साडेतीन वाजता मुंबईतील तापमान कमाल पातळीवर असताना विजेची मागणीही ३,९६८ मेगावॉट एवढी नोंदविण्यात आली. अर्थात सर्वच वीजनिर्मिती कंपन्यांचे परिस्थितीवर लक्ष असल्याने ती मागणी पूर्ण करण्यात आली.

आज उच्चांकी मागणीच्या काळात अदाणी इलेक्ट्रिसिटीने २,०८२ मेगावॉट एवढी वीज पुरवली तर टाटा पॉवरने ९६० मेगावॉट वीज पुरवली, उरलेला वीजपुरवठा बेस्ट ने केला. सोमवारपासूनच मुंबईतील विजेची मागणी वाढत असल्याचे आढळले होते. अर्थात दर उन्हाळ्यात अशी मागणी वाढत असल्याने सर्व वीज कंपन्यांनी परिस्थितीवर लक्ष ठेऊन तिला तोंड देण्याची तयारीही केली होती. अदाणी सारख्या कंपन्यांचे पथक तर एक-दोन दिवस आधीच हवामानाचा अंदाज घेऊन त्यानुसार विजेच्या संभाव्य मागणीचा आढावा घेऊन जादा वीजनिर्मिती-खरेदी यांचीही तरतूद करून ठेवतात.

मुंबईची वस्ती दिवसेंदिवस वाढत असून, निवासी आणि व्यापारी बांधकामेही मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. काही वर्षांत शहरात इलेक्ट्रिक वाहनेही मोठ्या संख्येने आल्याने त्यांचाही विजेचा वापर वाढला आहे. शहरातील आयटी कंपन्या, कार्यालये व आलिशान घरे यांची विजेची मागणी वाढत आहेत. कोरोनानंतर आता व्यापारी आणि व्यावसायिक कामे पूर्ण भराने सुरु झाल्यामुळे विजेचा वापरही वाढल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT