electricity rate
electricity rate sakal
मुंबई

Electricity Rate Increase : मुंबईकरांवर वीज दरवाढीचा ऐन उन्हाळ्यात भार; नवे दर आजपासून लागू

सकाळ वृत्तसेवा

वीज नियामक आयोगाने रात्री उशीरा अदानी इलेक्ट्रिसिटी, टाटा पॉवर आणि बेस्टच्या वीज दरवाढीला मंजूरी दिली आहे. ही दरवाढ आज शनिवार १ एप्रिलपासून लागू झाली.

मुंबई - वीज नियामक आयोगाने रात्री उशीरा अदानी इलेक्ट्रिसिटी, टाटा पॉवर आणि बेस्टच्या वीज दरवाढीला मंजूरी दिली आहे. ही दरवाढ आज शनिवार १ एप्रिलपासून लागू झाली. उन्हाच्या कडाक्याच्या महागाईच्या झळा सोसणार्‍या वीज ग्राहकांच्या खिसा वीज दरवाढीच्या कापला जाणार आहे. या दरवाढीने टाटा पॉवरच्या ग्राहकांना फटका बसणार आहे.

मुंबई उपनरात वीज वितरण करणार्‍या अदानी इलेक्ट्रिीसिटी, टाटा पॉवर, मुंबई शहरासाठी बेस्टने एमईआरसीकडे मागील थकबाकीबरोबरच २०२३-२४ आणि २०२४-२५ च्या वीजदर निश्चितीसाठी याचिका दाखल केली होती. त्यावर जनसुनावणी घेतल्यानंतर आयोगाने दरवाढ जाहीर केली. त्याचा भार सर्वसामान्य घरगुती ग्राहकांबरोबच औद्योगिक , वाणिज्यक ग्राहकांना बसणार आहे. त्यानुसार अदानी इलेक्ट्रिसिटीच्या घरगुती ग्राहकांच्या वीजदरात मोठी वाढ झाली असून ग्राहकांना प्रतियुनिमागे ४० पैशांपासून ७५ पैसे जादा मोजावे लागणार आहेत. टाटा पॉवरच्याही वीजदरात सर्वाधिक वाढ झाली आहे. त्यांच्या ०-१०० युनिट वीज वापर असलेल्या ग्रहकांचा सध्याचा दर १.७० रूपये होता. तो आता ३.०५ रूपये एवढा झाला आहे. मध्यमवर्गीयांबरोबच उच्चवर्गीयांना जवळपास दीड-पावणे दोन रूपये प्रतियुनिटमागे जादा मोजावे लागणार आहेत.

अदानी आणि टाटा पॉवरकडून ग्राहकांना लावल्या जाणार्‍या स्थिर आकारात पाच रूपयांची वाढ केली आहे.

वीज ग्राहकांना वीज दराबरोबरच सदरची वीज वाहून नेण्यासाठी येणारा खर्चही मोजावा लागतो. त्यानुसार वीज आयोगाने वीज वहन आकारातही मोठी वाढ केली आहे. सध्या अदानी इलेक्ट्रिसिटीचा प्रतियुनिटचा वहन आकार १.४७ रूपये होता, तो आता २.२१ रूपये होणार आहे. टाटाचा प्रतियुनिटचा वहन आकार १.४७ वरून १.६८ रूपये एवढा झाला आहे. बेस्टच्या वीज वहन आकारातही ३० पैशांची वाढ झाली आहे, त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT