Mahavitran Sakal
मुंबई

Mumbai : राज्यात साडेतीन कोटींच्या वीज चोऱ्या उघड;महावितरणच्या कारवाईत ३८३ प्रकरणे उघडकीस

महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाअंतर्गत असलेल्या कोकण, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या चारही परिक्षेत्रांमध्ये २४ ते २६ एप्रिल दरम्यान विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्यातील वाढत्या वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणकडून ठोस पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या विशेष मोहिमेत राज्यात अंदाजे साडेतीन कोटींची तब्बल ३८३ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत.

या वीजचोरी प्रकरणात या वीजचो-या प्रकरणी अंदाजे ३ कोटी ५० लाख रूपयांचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाअंतर्गत असलेल्या कोकण, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या चारही परिक्षेत्रांमध्ये २४ ते २६ एप्रिल दरम्यान विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली.

या विशेष तपासणी मोहिमे दरम्यान एकुण ३८३ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली. या वीजचोरी प्रकरणांमध्ये मोठया प्रमाणात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे.

महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनात ही मोहिम राज्यभरात सुरू करण्यात आली आहे. सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे प्रभारी कार्यकारी संचालक मुंबई सुमित कुमार यांच्या नेतृत्वात राबविण्यात आली आहे.

भविष्यात अशा प्रकारच्या विशेष तपासणी मोहिमा राबविण्यात येणार असल्याने ग्राहकांनी वीजचोरी न करता वीजेचा अधिकृत वापर करून महावितरण कंपनीस सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT