vaccine center vaccin center
मुंबई

मुंबईत लसींचा नाही पत्ता, BMC कडून लस केंद्राच्या उदघाटनांचा सपाटा

आज चार लसिकरण केंद्रांचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी उदघाटन केले.

समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोविड लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे (Mumbai facing vaccine shortage)नागरीक हैराण होत असताना महानगर पालिका (Bmc) रोजच्या रोज नवे नियम करुन ते रात्री प्रसिध्द करत आहे. लसींचा साठा (vaccine stock) उशिराने प्राप्त होत असल्याने लसीकरणही दुपारी सुरु होत असल्याने नागरीकांना केंद्रांमध्ये ताटकळत राहावे लागत आहे. अशातच,रोजच्या रोज नव्या केंद्राचे उदघाटन करुन महानगर पालिका स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे.

मुंबईत आज चार लसिकरण केंद्रांचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी उदघाटन केले. यात, पवई महानगर पालिका शाळा, चुनाभट्टी प्रसूती गृह,वरळी अपोलो मिल महानगर पालिका वाहानतळ आणि वरळी येथील नॅशनल स्पोर्टस कॉम्पलेक्स ऑफ इंडिया या चार केंद्रांचे उदघाटन करण्यात आले. मात्र,लशींचा साठा अपुरा असताना उदघाटनांचा घाट का घातला जातोय असा प्रश्‍न आता नागरीकांनाही पडू लागला आहे. (Mumbai facing vaccine shortage & Bmc starting new vaccination center)

त्यात महानगर पालिका रोज रात्री ट्वीट करुन दुसऱ्या दिवशीच्या लसीकरणाबाबत माहिती देत आहे. मात्र,त्यावर तक्रारींचा पाऊसही पडू लागला आहे. लशीकरण केंद्र सुरु करता पण नोंदणीच होत नाही अशी तक्रार सर्रास केली जात आहे. तर,दिलजीत या ट्वीटर हॅन्डलवरुन पालिकेच्या या ॲानलाईन प्रक्रियेवरच प्रश्‍न उपस्थित केला आहे.

जे ट्वीटर वापरत नाही त्यांचा विचार करावा असा सल्ला या हॅन्डलवरुन देण्यात आला आहे. तर,सौमिक सरकार यांनी कोविन ॲप मध्ये नोंदणी होत नसल्याची तक्रार करताना स्क्रीन शॉटही शेअर केले आहेत. लसिकरण केंद्राची संख्या वाढल्यास ठराविक ठिकाणी होणारी गर्दी कमी होईल तसेच नागरीकांनाही घरा जवळ लस मिळेल. त्यामुळे नवे केंद्र सुरु केले जात आहे.असा दावा महानगर पालिकेने केला.

तीन दिवसांपासून प्रयत्न

कांदिवली येथील उन्नीत कोठारी हा आपल्या पालकांसह दोन पिढ्यांसाठी लस मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. दोन दिवसांपुर्वी त्यांनी ऑनलाईन नोंदणीही केली होती. त्यानंतर कांदिवली ते बीकेसी असा प्रवासही केला. पण,बीकेसी केंद्रावर पोहचल्यावर लस संपल्याचे सांगण्यात आले. साठा नसताना वेळ कशी दिली असा प्रश्‍न उन्नीत यांनी विचारला आहे. दुसऱ्या दिवशीही त्यांचे लसिकरण होण्यात अडथळे आले. लॉगईन न करता कोविन ॲपवर लस उपलब्ध असल्याचे दाखवतात.पण,लॉगईन केल्यानंतर नोंदणी होत नाही.अशी तक्रार उन्नीत यांनी आज केली आहे.

नोंदणीनंतर रद्द

कोविन ॲप वर नोंदणी केल्यानंतर अचानक अनेकांना नोंदणी रद्द झाल्याचे मेसेज येत आहे. काही वेळा तर संबंधीत केंद्रच कोविन ॲप वरुन गायब झाल्याचे आढळले आहे, अशा अनेक तक्रारींचा पाऊसच पडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FASTag KYC Process : 'फास्टॅग' अपडेट करणं आता झालं अधिकच सोपं; जाणून घ्या कसं?

IND vs AUS 2nd T20I: मेलबर्नवर ६४८२ दिवसानंतर हरला भारत; लाजीरवाण्या पराभवानंतर सूर्यकुमार यादव वाचा काय म्हणतो

IND vs AUS 2nd T20I Live: ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय; अभिषेक शर्माची एकाकी झुंज व्यर्थ, भारताच्या अन्य फलंदाजांनी खाल्ली माती

Latest Marathi News Live Update : बोईसर एमआयडीसीत पुन्हा आग; रिस्पॉन्सिव्ह कंपनी जळून खाक, कामगारांमध्ये भीती

Telangana Revanth Reddy Cabinet: तेलंगणाच्या रेवंत रेड्डी सरकारचा मोठा निर्णय! भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधारास केलं मंत्री

SCROLL FOR NEXT