Western Railway sakal
मुंबई

Mumbai : अखेर २९ दिवसांचा मेगाब्लॉक संपला!  रविवारी ११० लोकल रद्द असल्याने मुंबईकरांचे झाले मेगाहाल !

सध्या मुंबईकरांना सहावा मार्ग प्रवासी सेवेत कधी येतो,याची रेल्वेकडून सांगण्यात आलेले नाहीत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - खार- गोरेगावदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी २९ दिवसांपासुन सुरु असलेल्या मेगाब्लॉकचा रविवार अखेर संपला आहे.  शेवटचा दिवशी म्हणजे रविवारी पश्चिम रेल्वेने तब्बल ११० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या.  त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचे मेगाहाल आहे.

पश्चिम रेल्वेवर पाचव्या आणि सहाव्या मार्गिका उभारण्यासाठी ७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत मेगाब्लॉक घेतला होता. हा ब्लॉक तब्बल २९ दिवस सुरु असल्याने  पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले आहे. मात्र, त्यातून आता प्रवाशांची सुटका झाली आहे.  ह्या ब्लॉकचा रविवार शेवटचा दिवस असल्याने रविवारी दिवसभरात ११० लोकल फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले आहे. मात्र, सहाव्या मार्गिकेमुळे पश्चिम रेल्वेची लोकल संख्या वाढणार आहे.

सध्या मुंबईकरांना सहावा मार्ग प्रवासी सेवेत कधी येतो,याची रेल्वेकडून सांगण्यात आलेले नाहीत. परंतु, बांधण्यात आलेल्या सहाव्या मार्गिकेची  पाहणी रेल्वे सुरक्षा आयुक्त सोमवारी ६ नोव्हेंबर रोजी करणार आहे. या पाहणीनंतरच सहावी मार्गिका सुरू करण्याचा निर्णय होईल अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

रविवारी हार्बवसियांचे हाल -

मध्य रेल्वेने रविवारी दिवसा मुख्य मार्गावर मेगाब्लॉक घेतला नव्हता. परंतु,सुट्टीच्या वेळापत्रकानुसार लोकल सेवा धावल्याने  मुख्य मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला आहे. तसेच हार्बर मार्गावर कुर्ला ते  वाशी स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला होता.

या दरम्यान कुर्ला ते पनवेल दरम्यानची लोकल सेवा पुर्णपणे बंद होती. त्यामुळे प्रवाशांना रस्त्या मार्गाने प्रवास करण्याची वेळ आली होती.  विशेष म्हणजे मुख्य मार्ग आणि ट्रान्सहार्बरवर लोकल फेऱ्यांची सांख्य कमी असल्याने अनेक स्थानकात प्रवाशांची गर्दीही दिसून आली होती. त्यामुळे दिवाळी सणानिमित्त घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचे हाल झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT