fire brigade sakal media
मुंबई

बजेटमध्ये अग्निशमन दलासाठी 745 कोटी; उंच ठिकाणच्या आगींसाठी भरघोस तरतुद

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अग्निशमन दलासाठी अर्थसंकल्पात 745 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.त्यातील 356 कोटी रुपयांचा खर्च प्रकल्पांवर होणार आहे.यात उंच इमारतींमधील लागणाऱ्या आगाची धोका लक्षात घेऊन यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येणार आहे.त्यासाठी उंच लॅडर आणि हायड्रॉलिक फ्लॅटर्फामची खरेदी करण्यात येणार आहे.त्याच बरोबर दुर्घटनांच्या वेळी जलद प्रतिसाद देण्यासाठी क्विक रिस्पॉन्स वाहानांसह मिनी फायर स्टेशन सुरु करण्यात येणार आहेत.ही जलद प्रतिसाद वाहाने विभाग कार्यालयांमध्ये तैनात करण्यात येणार आहेत.24 फायरबाईकची खरेदी करण्यात येणार आहे. त्याच बरोबर अग्निशमन दलातील जवान आणि अधिकाऱ्यांना वेळावेळी अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी कांदिवली येथील ठाकूर व्हिलेज फायर स्टेशनवर ड्रिल टॉवर कम मल्टी युटिलिटी ट्रेनिंग सिम्युलेटरचे बांधकाम करण्यात येणार आहे.

ठाकूर गाव, कांदिवली (पूर्व), एलबीएस रोड, कांजूर मार्ग (प.), जुहू तारा रोड सांताक्रूझ (प), माहुल रोड चेंबूर आणि आंबोली, अंधेरी (प) येथे नवीन अग्निशमन केंद्र बांधण्याचे काम हाती घेतले जाईल. अशी घोषणाही आयुक्त डॉ.इक्बाल सिंह चहल यांनी केली.

आगामी वर्षात नवे

  • अग्निशमन, पाळत ठेवणे आणि मूल्यांकनासाठी फायर ड्रोनची खरेदी.

  • मिनी फायर स्टेशन्स आणि महानगरपालिका प्रभागांसाठी क्विक रिस्पॉन्स वाहनांची खरेदी.

  • हायड्रोलिक प्लॅटफॉर्म आणि टर्न टेबल लॅडरसह एकत्रित अग्निशमन कम बचाव वाहनांची खरेदी.

  • फायर रोबोट्सची खरेदी.

  • इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी.

  • जुनी आणि कालबाह्य वाहने बदलणे.

सुरु असलेले प्रकल्प

  • अग्निशमनासाठी पाणी आणण्यासाठी तीन जलवाहतूक वाहने.

  • 55 मीटरचे वॉटर टॉवर वाहन.

  • उंच इमारतींसाठी अग्निशमन वाहन

  • 64 मीटर उंचीचे दोन टर्न टेबल लॅडर-, 70 मीटर उंचीचा 1 हायड्रोलिक प्लॅटफॉर्म- 50

  • मीटर उंचीचा 1 हायड्रोलिक प्लॅटफॉर्म- 32 मीटर उंचीच 1 एरियल लॅडर प्लॅटफॉर्म

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३.५१ लाख शेतकऱ्यांना दिलासा

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

SCROLL FOR NEXT