मुंबई

Mumbai fire | गोरेगावच्या बांगुरनगरमधील लक्ष्मी पार्क स्टुडिओ जळून खाक

निसार अली

मालाड  : गोरेगाव पश्चिम येथील बांगुरनगरस्थित लक्ष्मी पार्क स्टुडिओला  भीषण आग लागली. सदर आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे समजते. या आगीत दहा हजार स्केअर फुट असलेला संपूर्ण स्टुडिओ जळून खाक झाला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दोन तास केलेल्या अथक प्रयत्नामुळे सदर आग आटोक्यात आली. दरम्यान, रेसिडेंशयल एरियामध्ये स्टुडिओला परवानगी देता येत नाही. तरीसुद्धा या स्टुडिओला कशी परवानगी दिली याबाबत स्थानिक रहिवाशी एडवोकेट श्रेयांस मिठारे व बांगुरनगर रेसिडेन्शिअल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी  प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, ही आग पालिका व अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लागली असून तेच या आगीला कारणीभूत आहेत, असा आरोपही असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

बांगुर नगर येथील लक्ष्मी पार्क या स्टुडिओला भीषण आग लागली. स्टुडिओमध्ये काल आदिपुरुष या चित्रपटाचा मुहूर्त होता. सदर चित्रपटात सैफ अली खान, देवदत्त नागे व इतर कलाकार होते. शूटिंग झाल्यानंतर हे कलाकार तीनच्या आसपास गेल्यानंतर सदर स्टुडिओला आग लागल्याचे बोलले जात आहे. या आगीत सुदैवाने जीवितहानी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक व वित्तहानी झाली आहे. आग लागली त्यावेळी स्टुडिओमध्ये चारशे ते पाचशे कामगार काम करत होते. दरम्यान, गेल्या दोन वर्षापासून या स्टुडिओमध्ये शूटिंगचे काम चालू  होते. रात्रीही या स्टुडिओमधून मोठ्या प्रमाणात कर्कश आवाज येत असायचा. याबद्दलही स्थानिक रहिवाशांनी विरोध केला होता. परंतु याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचे.

दरम्यान, पाच इमारतीच्या दिवालालागून स्टुडिओचे ज्वलनशील पदार्थाचे साहित्य ठेवले जायचे. त्यामुळे भविष्यात दुर्घटना होऊ शकते, असेही स्थानिक रहिवाशांनी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीकडे जर वेळीच लक्ष दिले असते तर ही दुर्घटना झाली नसती, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
---------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Mumbai fire Lakshmi Park Studio in Bangurnagar Goregaon burnt down in mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंना बीडमध्येच एवढा पाठिंबा का मिळतो? गेवराईत मराठा समाजातल्या मुलींबद्दल आक्षेपार्ह विधान

जान्हवी जयंतला शिक्षा देणार! पण प्रोमो पाहून प्रेक्षक नाही झाले इम्प्रेस, "पुन्हा ये रे माझ्या मागल्या"

Sanjay Raut : नाशिक दत्तक घेतले मग समस्या का सुटत नाहीत? संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

Latest Marathi News Updates : जळगावात 17 सप्टेंबरला धडकणार शेतकरी जनआक्रोश मोर्चा

Medicine MRP Change: औषधं आणि वैद्यकीय उपकरणं स्वस्त होणार! केंद्र सरकारचा नवा आदेश लागू, अंमलबजावणी कधी करणार?

SCROLL FOR NEXT