Mumbai Fire News 
मुंबई

Mumbai Fire News : गृहसंकुलातील पाच वाहने जळून खाक : म्हारळ गावातील घटना

आग लावली की शॉर्ट सर्किट झाले...

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण ग्रामीण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील म्हारळ गावातील कुबेर हिल्स या गृहसंकुलामधील आवारात पार्क करून ठेवलेली पाच दुचाकी वाहने जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. ही वाहने कोणी जाळली की शॉर्टसर्किट मुळे वाहनांना आग लागली हर अद्याप उघड झाले नसून त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू असल्याची माहिती तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे.

कल्याण तालुक्यातील म्हारळ गावात गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर उभे करण्यात आलेली वाहने अज्ञातांकडून जाळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. असे असतानाच गावातील कुबेर हिल्स या गृह संकुलातील पाच वाहनांना शुक्रवारी पहाटे आग लागली. पहाटेच्या सुमारास पसरलेल्या धुरामुळे ही घटना उघडकीस आली. इमारत आवारात पहाटे पसरलेल्या धूराने नागरिकांची झोप मोड झाली. धूर कोठून येत आहे हे पाहण्यासाठी लोक बाहेर पडली असता पार्क केलेल्या वाहनांना आग लागल्याचे दिसुन आले.

अज्ञातांकडून ही वाहने जाळण्यात आल्याचे येथील नागरिकांनी म्हटले आहे. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. वाहने जळीत प्रकारात सीसीटीव्हीचा डीसीआर देखील जाळण्यात आला आहे. याबाबत कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे सीनियर इन्स्पेक्टर जितेंद्र ठाकूर यांना विचारले असता कोणी शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचे माहिती सांगत असून सीसीटीव्हीचे फुटेज पडताळूनच पुढील कारवाई ची दिशा ठरवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : सरकारने लोकांची गैरसोय करुन आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला- आशुतोष रांका

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT