Mumbai Rain Update 
मुंबई

Mumbai Rain Update: पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! रस्त्यांना नदीचे स्वरुप, यलो अलर्ट जारी

Mumbai Weather Update: मान्सूनचे आगन झाल्यानंतर पहिल्याच पावसाने मुंबईला झोडपून काढलं आहे. रविवारी संध्याकाळी मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला

कार्तिक पुजारी

मुंबई- मान्सूनचे आगन झाल्यानंतर पहिल्याच पावसाने मुंबईला झोडपून काढलं आहे. रविवारी संध्याकाळी मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. परळ भागात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आलंय. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढत जावं लागत आहे.

पहिल्याच दिवशी मुंबईची तुंबई झाली असं आपल्याला म्हणता येईल. दादर टीटी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. पूर्व उपनगरातही जोरदार पाऊस पडला. एका अॅम्बुलन्सला देखील या साचलेल्या पाण्याचा फटका बसला आहे. तसेच काही दुकानात देखील पाणी शिरल्याचे आपल्याला पाहायला मिळाले.

रात्री ११ ते १२ वाजेपर्यंत या एका तासात सर्वाधिक पाऊस नोंदवण्यात आलेले केंद्र पुढीलप्रमाणे.

(नोंद मिलिमीटरमध्ये)

शहर: ब्रिटानिया पर्जन्य जल उदंचन केंद्र- ७७;

जी दक्षिण विभाग- ७३

एफ दक्षिण विभाग- ७१

ना. म. जोशी मार्ग महानगरपालिका शाळा- ७०

वरळी अग्निशमन केंद्र- ६९

बी विभाग- ५५

पूर्व उपनगरे: वीणा नगर महानगरपालिका शाळा- ४०

मिठानगर महानगरपालिका शाळा- ३९

मुलुंड अग्निशमन केंद्र- ३२

पासपोली पवई महानगरपालिका शाळा- ३१

गवाणपाडा अग्निशमन केंद्र - २८

पश्चिम उपनगरे: एरंगल महानगरपालिका शाळा-७९

मालाड डेपो- ६४

गजदरबंद पर्जन्य जल उदंचन केंद्र-५९

पाली चिंबई महानगरपालिका शाळा-५५

सुपारी टॅंक महानगरपालिका शाळा-५४

के पूर्व विभाग-४८

उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना रविवारी काहीसा दिलासा मिळाला. पण, मुसळधार पावसामुळे त्रासाला देखील सामोरे जावे लागले. जोरदार पावसामुळे वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावर पाणी साचलं होतं. त्यामुळे लोकांना मार्ग काढून चालावं लागत होतं. मुंबईत रात्रभर पाऊस पडला आहे. सकाळच्या सुमारास पावसाने उसंत घेतली आहे.

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांना समूद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT