work four days week esakal
मुंबई

Mumbai : पाच दिवसांचा आठवडा रद्द करण्याचा प्रस्ताव

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा विरोध

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांची कामाची गुणवत्ता आणि खर्च सुधार धोरणानुसार पाच दिवसांच्या आठवड्याचे धोरण राज्य शासनाने अंगिकारलेले होते. मात्र,आता पाच दिवसांच्या आठवडा रद्द करण्याचा प्रस्ताव आलेला आहे. या प्रस्तावाला महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने विरोध केला आहे.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक व कौटुंबिक स्वास्थ्यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर, पाच दिवसांच्या आठवड्याचे धोरण राज्य शासनाने अंगिकारलेले आहे. संघटनांच्या आग्रही मागणी व अथक पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने, राज्य शासकीय कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा लागू करीत असताना, कार्यालयीन वेळेत देखील दररोज ४५ मिनिटांची वाढही केली आहे. या धोरणामुळे प्रशासकीय गतिमानता आणि शासन धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये वाढलेली परिणामकारकता केंद्राप्रमाणेच राज्यात देखील दिसून आली आहे. राज्यात अशी प्रशासकीय सुस्थिती असताना, पाच दिवसांच्या आठवडा रद्द करण्याचा प्रस्ताव येणे अत्यंत्य चुकीचे आहे.

पाच दिवसांच्या आठवड्याने मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्यांनी या पाच दिवसांच्या आठ्वड्याबाबत अडचणी वाढत असल्याची सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली होती. ह्या अडचणी लक्षात घेऊन पाच दिवसांच्या आठवडा रद्द करण्याचा प्रस्ताव तयार झाला आहे. या प्रस्तावाला मान्यतासाठी मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. मात्र, प्रस्ताव येण्याअगोदर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने जोरदार विरोध केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT