interview of aditya thackeray on rainy season flash flooding mumbai  esakal
मुंबई

मुंबईची 'तुंबई' यंदाही अटळ?; पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणतात...

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी शहरातल्या नालेसफाई तसंच इतर मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेतला.

सकाळ डिजिटल टीम

आगामी मान्सून हंगामासाठी मुंबई तयार असल्याचं राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. त्यांनी मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला. यामध्ये रस्तेदुरुस्ती, झाडांची छाटणी, नालेसफाई अशा कामांची पाहणी करत तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी वातावरणाविषयी चिंताही व्यक्त केली आहे. (Environment Aditya Thackeray on Mumbai Pre-monsoon preparations)

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले की, आम्ही आगामी मान्सूनची तयारी केली आहे पण शहरात यंदा अतिवृष्टी आणि महापुराची शक्यता आहे. जर एका तासात २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला तर शहरात पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होईल. पण, आम्ही नालेसफाईचं काम योग्य रितीने केलं आहे. पूर आल्यास त्या पाण्याचा लवकर निचरा होईल. संभाव्य पूर परिसरामध्ये महापालिका ४८० हून अधिक पंपिंग स्टेशन्स उभारेल.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, "महापालिकेने पुराची शक्यता असलेले ९० टक्के परिसर तपासले आहेत. मीही त्या त्या भागातल्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की, त्यांनी वेळोवेळी या परिसराची पाहणी करावी.आत्तापर्यंत महापालिकेने नालेसफाईची ७८ टक्के कामं पूर्ण केली आहे. उरलेलं काम वेळेत पूर्ण होईल. लोक अगदीच नाल्याच्या कडेला राहत असल्याने काही ठिकाणी नालेसफाईच्या कामात अडथळे येत आहेत. "

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT