Ashwini Matekar sakal
मुंबई

Ashwini Matekar : ठाकरे गटाला मोठा झटका ! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नेत्याचा शिंदे गटात जाहीर प्रवेश

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका अश्विनी अशोक माटेकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - चांदिवली विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक १५६ च्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका अश्विनी अशोक माटेकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी त्यांच्यासह उपविभाग प्रमुख अशोक परशुराम माटेकर, शाखा प्रमुख नितीन शंकर चव्हाण यांनीही शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षात स्वागत केले. सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या . तसेच चांदीवली विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रश्न सोडविनासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार संजय शिरसाठ, आमदार दिलीप लांडे, शिवसेना प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT