मुंबई

पोलिसाने माजी आमदाराच्या पत्नीला आत्महत्या करण्यापासून रोखलं

महिला पुलाच्या ग्रीलवर चढली होती.

दीनानाथ परब

नवी मुंबई: ड्युटीवर तैनात असलेल्या वाहतूक पोलिसाने एका महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखलं. शनिवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास मानखुर्द वाहतूक पोलिसांची टीम वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासमध्ये व्यस्त होती. त्यावेळी एका वाहन चालकाने एक महिला आत्महत्या करण्यासाठी पुलाच्या ग्रीलवर चढल्याचे सांगितले. त्यानंतर कॉन्स्टेबल ढगे लगेच घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले.

दुसऱ्या वाहतूक पोलिसाने नियंत्रण कक्ष, मानखुर्द आणि नवी मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. वेळप्रसंग लक्षात घेऊन कॉन्स्टेबलने त्या महिलेची समजूत काढली व तिला आत्महत्येपासून परावृत्त केले. ही महिला ग्रीलवरुन खाली उतरल्यानंतर तिला मानखुर्द पोलीस ठाण्यात नेले. तिथे तिने तिची ओळख सांगितली.

ही महिला एका माजी आमदाराची पत्नी आहे. घरगुती भांडणाला कंटाळून तिने हे आत्महत्येचे पाऊल उचलले होते. या महिलेला नवी मुंबई पोलिसांकडे सोपवण्यात आले. त्यांनी तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT