fraud  
मुंबई

लंडनमधील मैत्रिणीने गोव्यातील उद्योजकाला कोट्यवधींना फसवलं

तक्रारदार गोव्यातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत

अनिश पाटील, प्रतिनिधी

मुंबई : कर्करोगावरील औषधांच्या कच्च्या मालातून कोट्यवधींचा नफा मिळवून देण्याचं अमिष दाखवून एका महिलेने गोव्यातील (goa) प्रसिद्ध उद्योगपतीला कोट्यवधींचा गंडा घातला आहे. लंडनमध्ये राहणाऱ्या एका महिलेची आणि ८२ वर्षीय उद्योजकाची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. मात्र, या मैत्रिणीने उद्योजकाला पावने दोन कोटी रुपयांचा चुना लावला आहे. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले. (mumbai-fraud-case-cheating-of-rs-2-crores-by-facebook-friend)

तक्रारदार गोव्यातील हॉटेल व कॉर्पोरेट क्षेत्रातील नावाजलेले व्यक्ती आहे. त्यांची आणि या महिलेची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. संबंधित महिलेने आपण औषध कंपनीत वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी केली होती. तसंच ती काम करत असलेली कंपनी नागालँड येथून कर्करोगासाठी लागणा-या औषधासाठी कच्चा माल पुरवते व खरेदी करते असंही तिने सांगितले. म्हणूनच, हा व्यवसाय केला तर चांगला नफा होईल, असं सांगून तिने या व्यवसायिकाची फसवणूक केली.

तक्रारीनुसार, कुलाबा येथे वास्तव्याला असलेल्या व्यवसायिकाची फेसबुकद्वारे लंडनमधील एका औषध कंपनीतील खरेदी व्यवस्थापक महिला समन्था मॅथ्यू हिच्यासोबत फेब्रुवारी महिन्यात ओळख झाली होती. त्यावेळी कर्करोगासाठी लागणारा कच्चा माल कॅलाफायलू कॅल्शियम हे नागालँडमध्ये मिळते. त्यासाठी वर्मा इंटरप्राईजेसच्यामार्फत पाच हजार पाकीटे पाठवल्यास त्यावर 60 टक्के कमिशन अशा थेट नफा मिळू शकेल, असे तिने सांगितले. त्यानुसार, कंपनीसोबत व्यावसायिकाने संपर्क साधला. लंडनमधील कंपनीने 3 मे रोजी याबाबत करारही केला. त्यानुसार व्यावसायिकाला पाच हजार पाकिटे पाठवणे अपेक्षित होते. पण त्यापूर्वी या कच्चा मालाचे नमुने पाठवण्यासाठी कंपनीकडून सांगण्यात आले. त्यातील प्रत्येक पाकिटासाठी व्यावसायिकाला सुमारे दोन लाख रुपये मिळणार होते. नागालँडमधील कंपनीतून हे पाकिटे केवळ 75 हजार रुपयांचा पडणार होते. त्यानुसार, व्यावसायिकाने 75 हजार रुपये देऊन पाच पाकिटे नमुना म्हणून खरेदी केली. त्यानंतर लंडनमधील कंपनीने नमुना म्हणून पाचशे पाकिटे मागवली. या पाकिटांची आगाऊ रक्कम व विविध कारणांसाठी व्यावसायिकाने एक कोटी 70 लाख रुपये विविध खात्यांमध्ये जमा केले. पण कच्चा माल व्यावसायिकाला मिळाला नाही. कंपनीचा मालक अनेक कारणं सांगत होता. अखेर कंपनीचे अधिकारी व्यावसायिकाला भेटण्यासाठी येणार होते. तशी विमानाची तिकीटांची छायाचित्रेही त्यांनी ई-मेलद्वारे पाठवली. पण विमानतळावर कोणीच भेटायला आला नाही, अखेर व्यावसायिकाला आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनी याप्रकरणी कुलाबा पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

संपादन : शर्वरी जोशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT