laalbag sakal
मुंबई

Mumbai Ganesh festival : लालबागचा राजा व्हीआयपी दर्शन बंद करा,मुंबईच्या डबेवाल्यांची मागणी

शुक्रवारी तर कळस झाला उर्फी जावेद या मॉडेलला व्हिआयपी च्या नावा खाली थेट श्रीच्या चरणी दर्शनाला नेण्यात आले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - : हरी हरा भेद । नाही करू नये वाद ।।१।। एक एकाचे ह्र्दयी । गोड़ी साखरेच्या ठायी।।जसा हरी- हरात भेद करू नये तसा भक्त भक्तानं मध्ये भेद करू नये अशी आपली संस्कृती सांगते.पण लालबागचा राजा गणपती मंडळाने सर्रासपणे या नियमाला तिलांजली दिली आहे.व्हीआयपींना रेडकार्पेट अथरून दर्शन दिले जात आहे तर सर्वसामान्य गणेशभक्तांना हाडतुड केले जात आहे. हा भेदभाव अयोग्य असून लालबागचा राजाचे व्हिआयपी दर्शन बंद करा अशी मागणी मुंबईच्या डबेवाल्यांनी केली आहे.

गणेशभक्त चोवीस चोवीस तास रांगेत उभे राहून लालबागच्या राजाचे ओझरतं दर्शन घेत आहेत तर दुसरीकडे खास व्यक्तींना व्हिआयपीच्या नावाखाली थेट लालबाग राजाच्या पाया जवळ नेऊन दर्शन दिले जात आहे.याबद्दल मुंबई डबेवाला असोशिएशन अध्यक्ष सुभाष तळेकर यांनाही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शुक्रवारी तर कळस झाला उर्फी जावेद या मॉडेलला व्हिआयपी च्या नावा खाली थेट श्रीच्या चरणी दर्शनाला नेण्यात आले.हे मात्र खटकणारे आहे.उर्फी चे समाजासाठी , देशासाठी काय योगदान आहे याचे उत्तर व्यवस्थापकांनी द्यावे.ही दर्शनाला रांग लावलेल्या गणेश भक्तांची थट्टा आहे. देवाने भक्ता भक्तानं मध्ये भेदभाव केला नाही मग लालबागचा राजा मंडळ भक्तां भक्तानं मध्ये भेदभाव कसे करू शकते असा सवाल ही तळेकर यांनी विचारला आहे.

रांगेत दर्शन घेणाऱ्या भक्तांना रेटा रेटीला सामोरे जावे लागते आहे. काही ठिकांणी मंडळांचे स्वयंसेवक भक्तांना धक्का बुक्की करत आहेत.नियोजनाचे तिन तेरा वाजले आहेत.मांढरगडावर जशी चेंगराचेंगरी होऊन अनेकांचे प्राण गेले तशी परिस्थिती लालबागच्या राजाच्या ठिकांणी कधी ही घडू शकते अशी परिस्थिती आहे. एक गणेशभक्त दर्शनासाठी रांगेत चोविसतास उभा राहतो मात्र व्हिआयपी गणेशभक्त थेट श्रीच्या चरणी जातो हा भेदा-भेद लालबागचा राजा मंडळाने बंद करावा.

उर्फी जावेद यांचे मुंबईसाठी काय योगदान आहे माहीत नाही,पण डबेवाल्यांची मुंबईसाठी थोडे का होईना योगदान निश्चित आहे.जर डबेवाला कामगार लालबागचा राजा दर्शनास आला तर मंडळ त्या व्हिआयपी दर्शन देईल का असा सवाल ही तळेकर यांनी विचारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT