Mumbai ganeshotsav 2022 
मुंबई

Mumbai Ganeshotsav : गणेश मंडपाना परवानगीसाठी शुक्रवार पर्यंत मुदतवाढ

महानगरपालिकेकडे रस्त्यावर मंडप उभारण्यासाठी २७३२ अर्ज आले आहेत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई क्षेत्रात गणेश मंडळ मंडपाना परवानगी देण्याची अंतिम मुदत मंगळवार २३ ऑगस्ट पर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, विविध गणेश भक्त व मंडळांची त्यास मुदतवाढ देण्याची विनंतीकेल्यानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने शुक्रवार पर्यंत मुदतवाढ केली आहे.

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने गणेशोत्सव मंडप परवानगी अर्ज सादर करण्याची मुदत शुक्रवार, दिनांक २६ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत वाढवली आहे, अशी माहिती उपायुक्त (परिमंडळ- २) तथा सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक हर्षद काळे यांनी दिली आहे.

१९४७ सार्वजनिक मंडळांना मंडप बांधण्यासाठी परवानगी कोरोना काळाच्या दोन वर्षानंतर यंदा पुन्हा मुंबईत उत्साहात गणेशोतसवाची तयारी सुरू आहे, दरम्यान यंदा महानगरपालिकेकडे रस्त्यावर मंडप उभारण्यासाठी २७३२ अर्ज आले आहेत तर यापैकी १९४७ मंडळांना परवानगी देण्यात आली असून ४१५ मंडळांना परवानगी नाकारण्यात आली आहे.

दोन वर्षानंतर यंदा कोरोनाकाळाच्या पूर्वी प्रमाणेच गणेशोत्सव साजरा होत आहे. मुंबई महापालिकेने सार्वजनिक मंडळाना मंडप बांधण्यासाठिची परवानगी प्रक्रिया सुरू करत ४ जुलै पासून एक खिडकी योजना पण राबवण्यात आली होती. यावेळी महापालिकेकडे एकूण ३२५५ अर्ज आले होते.या योजनेअंतर्गत मुंबई महानगरपालिकेकडे ५२३ अर्ज दुबार आहेत. त्यामुळे २७३२ अर्जांची तपासणी करून १९४७ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. तर ४१५ अर्ज नाकारण्यात आले असून अद्यापही ३७० आहेत अर्ज हे प्रक्रियेत आहेत.

दरम्यान मुंबई महानगरपालिकेने मंडप उभारण्यासाठी नियम जाहीर केले आहेत हे नियम आधीसारखेच असून याप्रमाणे मंडपांची उंची ३० फूटांपेक्षा अधिक नसावी, तसेच २५ फूटांपेक्षा अधिक उंची असलेल्या मंडपांच्या बांधणी व मंडप मजबूत असेल याबाबतची हमी मंडळांना द्यावी लागणार आहे. नव्या मंडळाला गणेशोत्सवासाठी जागा हवी असल्यास स्थानिक पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे.त्याचप्रमाणे मंडप रस्त्यावर खोदू नये अशी सूचना पालिकेने केली असून मंडपसाठी खड्डे खोदल्याचे पालिकेला दिसल्यास प्रति खड्डा २ हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Tree Fall Incident : पुण्यातील विमाननगरमध्ये चालत्या गाडीवर कोसळलं गुलमोहराचं झाड; सुदैवाने जीवितहानी टळली, पण वाहतूक कोंडीचा नागरिकांना फटका

IPL 2026: तीन बॅट, तिनदा रिजेक्ट अन् मग अंपायरलाच कळाली चूक; आयुष म्हात्रेच्या बॅटवरून मैदानात गोंधळ, नेमकं काय घडलं

Latest Marathi News Live Update : दिंडोरीतील अपघातग्रस्त विहीर बुजविण्याचे काम सुरू

नागपूरमध्ये ४५ बार बंद, परवाना शुल्कात वाढ झाल्याने मालकांवर आर्थिक ताण

Numerology : प्रचंड हुशार असतात 'या' 3 मूलांकाचे लोक; पण व्यसन नाही, तर 'या' वाईट सवयीमुळे जीवनात यश मिळायला लागतो खूप उशिर

SCROLL FOR NEXT