Ghatkopar building collapse 
मुंबई

Ghatkopar building collapse: घाटकोपरमधील इमारत दुर्घटनेत मोठी अपडेट; 'त्या' दोघांचा मृत्यू

घाटकोपरमधील इमारत दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचा मृत्यू

धनश्री ओतारी

घाटकोपरमधील इमारत दुर्घटनेत मोठी अपडेट समोर आली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

काल सकाळी ही इमारत कोसळली. यात चौघेजण ढिगाऱ्याखाली अडकले होते. यातील दोघांना कालच बाहेर काढण्यात यश आलं. पण या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांसाठी कालपासूनच बचाव कार्य सुरू होतं. आज या दोघांना बाहेर काढण्यात आलं. मात्र या दोघांचा मृत्यू झाला आहे. आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. तसंच एक कुत्राही या इमारतीत अडकला होता. त्याचाही मृत्यू झाला आहे.

पोस्टमार्टमसाठी दोघांचे मृतदेह राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले आहेत. घाटकोपरमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना 21 तासांनंतर बाहेर काढण्यात आलं आहे. घाटकोपरमधल्या राजावाडी परिसरातील चित्तरंजनगरमध्ये काल सकाळी 9 वाजेच्या सुमारात इमारत कोसळली. राजावाडी कॉलनीमधील बिल्डिंग नंबर बी / 7 /166 ही तीन मजली इमारत कोसळली.

इमारतीच्या जमिनीचा काही भाग खचल्याने वरच्या तीन मजल्यांनाही तडे गेले. या इमारतीत 4 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. फायर ब्रिगेडचे जवानांनी इमारतीमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यातील दोघांना कालच बाहेर काढण्यात यश आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirmala Nawale: निर्मला नवले यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी; जिल्हा परिषद निवडणुकीत पराभवानंतरही संघटनेत स्थान

Uruli Kanchan Garbage: उरुळी कांचनमधील पद्मश्री मणिभाई देसाई कॉलेजच्या प्रवेशद्वारावर कचराकुंड्यांचे साम्राज्य; विद्यार्थ्यांचे ‘कचरा स्वागत’

Marathi News Live Updates: कपिल सिबल यांनी निवडणूक आयोगाकडून झालेली एक गंभीर चूक निदर्शनास आणून दिली - अनिल देसाई

Pune illegal hill cutting issue: पुण्यात टेकडीफोडीला लगाम घाला; बेकायदेशीर बांधकामे थांबवा, परवानग्या रद्द करण्याचे स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश

Pune Civic Tenders: महापालिकेच्या रखडलेल्या शेकडो कोटींच्या निविदा दोन दिवसांत मार्गी लावा; राजकीय दबावाला बळी न पडण्याचे स्थायी समिती अध्यक्षांचे आदेश

SCROLL FOR NEXT