Ghatkopar Hoarding Collapse Esakal
मुंबई

Ghatkopar Hoarding Collapse: काळजात धडकी भरवतात ते १७ सेकंद; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा दुसरा VIDEO आला समोर

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा दुसरा व्हिडीओ समोर आला आहे. हा एकूण १७ सेकंदांचा व्हिडीओ आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईमध्ये सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठी हानी झाली, याचवेळी घाटकोपरमध्ये भलमोठं होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवीत आणि वित्त हानी झाली आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८८ जण जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर आता या घटनेचा दुसरा व्हिडीओ समोर आला आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

हे भलंमोठं होर्डिंग कोसळत असतानाच रस्त्यावरुन जाणाऱ्या कारमधील एका प्रवाशाने हा व्हिडीओ काढला आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, होर्डिंग कोसळतं तेव्हा अंगावर काटा उभा राहतो अशी थरारक दृश्ये या व्हिडीओमध्ये दिसतात. पेट्रोल पंपाशेजारुन कार जात असताना भलंमोठं होर्डिंग कोसळत असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं. हा एकूण १७ सेकंदांचा व्हिडीओ आहे.

दुर्घटना झालेले हे होर्डिंग अनधिकृतपणे त्या ठिकाणी लावण्यात आलं होतं. इतकंच नाही तर होर्डिंगसंदर्भात नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र, होर्डिंग तसंच ठेवण्यात आलं होतं. सोमवारी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली.

होर्डिंगचा मालक भिंडे कोण आहे?

जानेवारी २०२४ मध्ये घाटकोपरच्या पंतनगर पोलिस ठाण्यात भिंडेवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. आरोपपत्र दाखल झाले आहे. २००९ मध्ये भिंडेने अपक्ष उमेदवार म्हणून मुलंड विधानसभेची निवडणूक लढवली होती. तेव्‍हा त्याचे डिपॉझिट जप्त झाले. बेकायदा फलक लावल्याप्रकरणी आतापर्यंत त्याला पालिकेने २१ वेळा दंड ठोठावला आहे. धनादेश बाउन्सप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. होर्डिंग कोसळल्याच्या अपघातात ‘भादंवि’च्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CCMP BHMS Registration : सीसीएमपी-बीएचएमएस नोंदणीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; आयएमएकडून राज्यव्यापी सेवा बंदची घोषणा

PMC Development : स्वच्छतागृहे दुरुस्तीऐवजी पाडण्यावर नगरसेवकांचा भर; ५५ प्रस्ताव नव्या बांधकामासाठी

Crime News : माहूरवरून परतणाऱ्या नवविवाहितांवर थरारक हल्ला; नववधूसह दोन लाखांची रोकड लंपास

Karad News : मतदारयादी सखोल पुनरिक्षणात कऱ्हाड दक्षिणची बाजी; पुणे विभागात प्रथम

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

SCROLL FOR NEXT