Crime news 
मुंबई

Mumbai : वसतिगृहातील मृत्यू प्रकरणातील तरुणीचा हत्येपूर्वी बलात्कार; पोलिसांची माहिती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईतील एका वसतिगृहात मृतावस्थेत सापडलेल्या 18 वर्षीय तरुणीची हत्या करण्यापूर्वी आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तरूणीच्या हत्येनंतर पोलीस बलात्काराच्या आरोपांबाबत तपास करत होते. पोलिसांनी मृत तरुणीचे डीएनए नमुने फॉरेन्सिक प्रयोगशाळेत एफएसएलकडे पाठवले होते.

यानंतर आरोपीने तरुणीवर बलात्कार केल्याचे फॉरेन्सिक अहवालाने पुष्टी केल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. डीएनए अहवालात पोलीस आता हत्येव्यतिरिक्त या प्रकरणात बलात्काराचा आरोप आरोपपत्रात जोडणार आहेत.

मुंबईतील चर्चगेट भागातील सावित्रीबाई फुले वसतिगृहमध्ये 21 वर्षीय मुलीवर बलात्कार व हत्या झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी 6 जूनला उघडकीस आली. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आल. वसतिगृहातील राहत्या खोलीत मुलीचा मृतदेह मंगळवारी नग्न अवस्थेमध्ये सापडला.

पीडित मुलगी मूळची अकोल्याची असून बांद्रातल्या एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये शिकण्यासाठी मुंबईत आली होती.जवळपास मंगळवारी संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास घटना उघडकीस होताच मरीन ड्राईव्ह पोलिसाना सांगण्यात आले. त्वरित पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले . या प्रकरणी आरोपी वॉचमन प्रकाश कनोजियाने बलात्कार करून घटनेनंतर फरार झालं आणि लोकल गाडी खाली आत्महत्या केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद होणार, गणेशोत्सवासाठी प्रशासनाची खबरदारी

Women’s Asia Cup 2026: टीम इंडिया जिंकली तर पुन्हा होणार ‘ट्रॉफी ड्रामा’? मोहसिन नकवी फायनलमध्ये येणार, गेल्या वर्षाची आठवण ताजी

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांना पाठिंब्यासाठी मोडनिंबमध्ये कडकडीत बंद

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर उपायासाठी हालचालींना वेग; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला गती

शिंदेंसेनेच्या नेत्याचा रुग्णालयात राडा! बिलावरून वाद, कर्मचाऱ्याला शिवीगाळ अन् मारहाण करत...; पालघरमध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT