मुंबई

मुंबई- गोवा महामार्गावर विनापरवाना खैराची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई

देवेंद्र दरेकर

मुंबई:  मुंबई गोवा महामार्गवर खैराची वाहतूक खुलेआम सुरू आहे. कारवाईचा बडगा उगारण्यात आल्यानंतर वाहतूक सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर वनविभाग तपासणी नाक्याजवळ मिळालेल्या गुप्त माहिती नुसार विनापरवाना खैराची वाहतूक करणाऱ्या टेम्पो वर कारवाई करण्यात आली असून टेम्पो जप्त करण्यात आला आहे. 

ठाणे पालघरसह त्या पुढील जंगल भागातून मोठ्या प्रमाणावर खैराची झाडाची कत्तल होत असून रात्रीच्या सुमारास त्याची चोरटी वाहतूक तळ कोकण सह कर्नाटक राज्यात होत आहे. मुंबई गोवा महामार्गावर आठवडाभरात महाडजवळ वीर टेंभेवाडी जवळ तर 29 जानेवारी शुक्रवारी सकाळी पोलादपूर तपासणी नाका येथे टेम्पोची तपासणी करत कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गुप्त माहितीनुसार, वनपरिमंडल अधिकारी पोलादपूर श्याम गुजर वनरक्षक, नवनाथ मेटकरी, निलेश वाघमारे, निलेश नाईकवाडे फिरते पथक  वनपाल आर जी पाटील रोहा, अजिंक्य कदम यांनी संयुक्त विद्यमाने विनापरवाना खैर सोलीवची वाहतूक करणारा आयशर टेम्पो जी जे 15 ए टी 4704 वरील चालक हादिस खान राहणारा तलासरी गुजरात आणि मालक अब्बास खान गुजरात यांना थांबवत टेम्पोची तपासणी करत कारवाई केली. या टेम्पोमध्ये  खैर सोलीव नग घमी 14.112 किंमत 1 लाख 71 हजार 144 रुपयांचे लाकूड सह 10 लाख किंमतीचा टेम्पो जप्त केला आहे.

या प्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम  26 (1) ,फ 41 (2) ब, 42 अन्वय चालक आणि मालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Goa highway Action taken tempo for transporting unlicensed garbage

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT