मुंबई

Mumbai Goa Highway: बेजबाबदार कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

Ekanth Shinde: गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कामाची पाहणीही त्यांनी यावेळी केली

सकाळ वृत्तसेवा

Latest Kokan News: गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या नागरिकांना दरवर्षी खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महामार्गाची पाहणी करत झाडाझडती घेतली. ‘ज्या कंत्राटदारांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम घेऊन कंत्राट सोडून पळ काढला आहे,

अशा कंत्राटदारांच्या दिरंगाईने या मार्गावर अपघात घडत आहेत. अशा बेजबाबदार कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात आलेले आहेत. यात कोणालाही दयामाया दाखवली जाणार नाही,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदारांना इशारा दिला.

मुख्यमंत्री शिंदे यांनी पळस्पे ते कशेडी घाट या दरम्यान अधिकाऱ्यांसह ठिकठिकाणी थांबून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. गणेशोत्सवास काही दिवस शिल्लक असताना या महामार्गावरील खड्डे भरण्याच्या कामाने अद्याप वेग घेतलेला नाही. हे रडगाणे मागील अनेक वर्षांपासून चालू आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची खड्ड्यांमुळे गैरसोय होऊ नये म्हणून शिंदे यांनी आज पाहणी दौरा आयोजित केला होता.

या रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे आणि ते बुजवताना येणाऱ्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या. गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कामाची पाहणीही त्यांनी यावेळी केली. यानंतर याबाबत अधिकाऱ्यांबरोबर सविस्तर चर्चाही केली.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रास होऊ नये, यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ‘‘कोकणात पडणारा पाऊस आणि डांबराने भरण्यात येणारे खड्डे हे समीकरण जुळत नसल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रभावीपणे केला जात आहे.

ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत, त्या ठिकाणी सिमेंटच्या तयार प्लेट्स वापरून काही तासांत रस्ता वाहतुकीसाठी योग्य केला जात आहे,’’ असे शिंदे म्हणाले. एम- ६० आरएफसी-लिओ पॉलिमर पद्धत, रॅपिडेक्स हार्डनर एम-६० पद्धत, डीएलसी या तीन पद्धतींबरोबरच ब्रिक्स कास्ट एम-६० या पद्धतीने सिमेंटच्या तयार प्लेट्स बसवून रस्ता तयार करण्यात येत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT