Mumbai-Goa Highway sakal media
मुंबई

Mumbai-Goa Highway Traffic : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज वाहतुकीत महत्वाचे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या आदेशानुसार, शुक्रवारी एक दिवसापुरता वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

रोहित कणसे

Mumbai-Goa Highway Traffice Update today : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी असून आज म्हणजे शुक्रवारी महामार्गावर वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे आज (शुक्रवारी, ता. ५) मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पार पडणारा आहे. दरम्यान या कार्यक्रमासाठी जवळपास ७५ हजार नागरिक उपस्‍थित राहणार असल्‍याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या आदेशानुसार, शुक्रवारी एक दिवसापुरता वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

कार्यक्रमाकरिता येणाऱ्या नागरिकांमुळे वाहतूक कोंडीची शक्‍यता गृहीत धरून तसेच कार्यक्रम सुस्थितीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून उपाय योजना करण्यात येत आहेत.

असा आहे वाहतुकीत बदल

५ जानेवारी २०२४ मध्यरात्री १२ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत दूध, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्‍सिजन, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना वगळून इतर सर्व जड-अवजड वाहनांना मुंबई-गोवा महामार्गावरून गोवा बाजूकडून मुंबईकडे जाणाऱ्या कशेडी (ता.पोलादपूर) ते खारपाडापर्यंत (ता.पेण) व मुंबई बाजूकडून येणाऱ्या खारपाडा ते कशेडीकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे खोपोली-पालीफाटा ते वाकण या महामार्गावरून गोवा बाजूकडे व मुंबईकडे येणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना बंदी आहे. तसेच ५ जानेवारीला सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत व दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत मुंबईकडे जाणारी वाहने ही मोर्बेमार्गे माणगाव वळवण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाची जय्यत तयारी

लोणेरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्‍त्र विद्यापीठाच्या पटांगणावर शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सुमारे १२ एकरवर सभामंडप, २५ एकर जमिनीवर लाभार्थांना बसण्यासाठी, खाद्य पदार्थांचे स्‍टॉल तसेच पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. सुमारे ४० एकरवर तीन भव्य मंडप उभारले आहेत. याशिवाय व्हीआयपी मान्यवरांच्या वाहनांना स्वतंत्र पार्किंग, दोन हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्या काम करीत आहेत. जिल्ह्यातून ७५ हजार नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

2 कार्यक्रमासाठी लोणेरे बाजारपेठ ते तंत्रशास्‍त्र विद्यापीठादरम्‍यान रस्त्याचे काम करण्यात आले आहे. साईडपाट्याही भरण्यात आल्या आहेत. लाभार्थींची कसलीही गैरसोय होवू नये म्हणून भव्य सभामंडप, पार्किंग व्यवस्था, पाणी व्यवस्था, फास्ट फूड व्यवस्था, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह, वीज पुरवठा, लाभार्‍थ्‍यांना ने - आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT