Mumbai Goa Highway Traffic sakal
मुंबई

Ganeshotsav : मुंबईहून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्‍तांसाठी असे आहेत पर्यायी मार्ग

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांपुढे मुंबई गोवा-महामार्गावरील खड्डे, त्‍यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी यासारखे अनेक विघ्न उभी आहेत.

सकाळ वृत्तसेवा

महाड - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांपुढे मुंबई गोवा-महामार्गावरील खड्डे, त्‍यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी यासारखे अनेक विघ्न उभी आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी पर्यायी मार्गाची माहिती देण्याकरता समाज माध्यमावर व्हिडिओ क्लिप प्रसारित केली आहे. यामुळे गणेशभक्तांना प्रवास करताना या ग्रुपचा उपयोग होणार आहे.

मुंबई-गोवा मार्गाचे पहिला दुसऱ्या टप्प्यातील रुंदीकरणाचे काम अनेक ठिकाणी रेंगाळले आहे पनवेल ते इंदापूरदरम्यान खड्ड्यांमुळे चालकांना वाहने संथगतीने न्यावी लागत आहेत. त्यातच गणेशोत्सवातील विक्रमी वाहतुकीमुळे महामार्ग जाम होत आहे.

याकरिता पोलिस दलांकडून वाहतूक कोंडीची ठिकाणे, काम सुरू असलेली ठिकाणे, रस्त्यावरील दुभाजक, बॉटल नेक पॉइंट अशा ठिकाणांचा अभ्यास करून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. अशा नियोजनाची तसेच पर्यायी मार्गाची माहिती देणारी व्हिडिओ क्लिपही प्रसारित करण्यात आली आहे.

३१ ऑगस्टपासून मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी आहे. वाहतूक कोंडी झाल्यास प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन महाराष्ट्र पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे.

कशेडी घाटाला पर्याय

कशेडी घाटाचा बोगदा सुरू करण्यात आला असला तरी एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या घाटात वाहतूक कोंडी झाल्यास गणेशभक्‍तांनी महाड-विन्हेरे नातूनगर या मार्गे प्रवास करावा. या रस्ता सुस्थितीत आहे.

हे आहेत पर्यायी मार्ग

  • पेण पुढे वाहतूक कोंडी झाल्यास तरडखोल, पेण बायपास, पाली फाटा, पालीमार्गे वाकण.

  • वडखळ पुढे वाहतूक कोंडी झाल्यास वडखळ-पोयनाड-पेजारी चेकनाका नागोठणेमार्गे वाकण.

  • नागोठणे पुढे वाहतूक कोंडी झाल्यास - नागोठणे, वेलशेत फाटा, वरवठणे, भिसे खिंडमार्ग किंवा रोहामार्गे कोलाड.

  • वाकण पुढे वाहतूक कोंडी झाल्यास - वाकण-पाली-नांदगाव, विळे, सुतारवाडीमार्गे कोलाड किंवा निजामपूरमार्गे माणगाव.

  • कोलाड पुढे वाहतूक कोंडी झाल्यास - कोलाड-सुतारवाडी, विळे, निजामपूरमार्गे माणगाव.

  • माणगाव पुढे वाहतूक कोंडी झाल्यास - माणगाव, मोरबे फाटा, मोरबे गाव, दहिवलीमार्गे लोणेरे.

  • महाड पुढे वाहतूक कोंडी झाल्यास - कशेडी घाटाला पर्याय विन्हेरेमार्गे खेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT