crime
crime sakal
मुंबई

Mumbai Crime : सोन्याची तस्करी करणाऱ्या आंतररार्ष्ट्रीय टोळीचा सदस्य अटकेत

सकाळ वृत्तसेवा

150 कोटी रुपये किंमतीच्या सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा सदस्य असणाऱ्या आरोपीला महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने डीआरआयने गुडगाव येथून अटक केली.

मुंबई - 150 कोटी रुपये किंमतीच्या सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा सदस्य असणाऱ्या आरोपीला महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने डीआरआयने गुडगाव येथून अटक केली. नवनीत सिंह असे आरोपीचे नाव असून सोन्याची तस्करी करणाऱ्या चीन आणि दुबईतील नागरिकांचा समावेश असणाऱ्या टोळीचा तो सदस्य आहे.या टोळीशी संबंधीत दोघांना गेल्या वर्षी मे महिन्यात डीआरआयने अटक केली होती. त्याप्रकरणी 7 कोटी रुपये किमतीचे 16 किलो सोने जप्त करण्यात आले होते. हे सोने हाँगकाँगमधून आणले होते आणि एअर कार्गोद्वारे भारतात आणले जात होते. आरोपी इलेक्ट्रिक ब्रेकर यंत्रात दडवून सोन्याची तस्करी करीत होते.

डीआरआयच्या माहितीनुसार सिंह या टोळीचा प्रमुख सदस्य आहे. त्याने तस्करी करून आणलेल्या सोन्याची वाहतूक आणि ते लपवण्यासाठी मदत केली होती. तसेच इतर सदस्यांना लपवण्यासाठीही तो मदत करायचा. डिसेंबर 2021 मध्ये सिंह मुंबईत आला होता आणि त्याने कांदिवली येथे सदनिका आणि गोरेगावमध्ये एका आरोपीसाठी दुकानाची व्यवस्था केली होती. सिंह याने एका आरोपीच्या नावावर मोटरगाडीही खरेदी केली होती. याच वाहनातून तस्करीचे सोने मुंबई एअर कार्गो संकुलामधून कांदिवली सदनिकेपर्यंत नेण्यात येणार होते. इतर आरोपी या सदनिकेत यंत्रातून सोने बाहेर काढणार होते.

यापूर्वी या टोळीने 150 कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी केल्याचा संशय आहे. बेकायदेशीर सोन्याच्या विक्री आणि खरेदीसाठी ते हवाला रॅकेटचा वापर करीत असल्याचा डीआरआयला संशय आहे. याप्रकरणी सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी शुक्रवारी सिंहला अटक करण्यात आली. या टोळीचे काही सदस्य दिल्लीत सक्रीय असल्याचा डीआरआयला संशय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT