Mumbai Water Crisis Sakal
मुंबई

Mumbai Water Crisis : गोराईत पाण्याचा ठणठणाट; पिण्याच्या पाण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका, आज सुनावणी

वाढत्या उकाड्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष वाढले असून मुंबईतल्या गोराईत रहिवाशांना पाणी मिळेनासे झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News : वाढत्या उकाड्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष वाढले असून मुंबईतल्या गोराईत रहिवाशांना पाणी मिळेनासे झाले आहे. याप्रकरणी रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून पालिकेने सुरळीत पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली आहे. मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठासमोर बुधवारी (ता.८) सुनावणी होणार आहे.

बोरिवली पश्चिम येथील गोराई गावात रहिवाशांना अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. पालिकेकडून पुरवठा केला जाणारे पाणी कमी दबावामुळे येत असून पाण्याअभावी रहिवाशांचे हाल होत आहेत. ५ हजार कुटुंबे या ठिकाणी राहत असून सुमारे २ हजार कुटुंबीयांकडे पाण्याचे नळ आहेत मात्र यातून पाणी येईनासे झाले आहे.

या प्रकरणी गोराई विलेजर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगण्यात आले की,

या ठिकाणी विहिरी आहेत मात्र तेथील पाणी पिण्यास योग्य नाही उच्च न्यायालयाने पालिकेला जास्त दाबाने पाणी पुरवठा करण्यास सांगितले होते मात्र तसे होताना दिसत नाही त्यामुळे पालिकेने पाण्याची समस्या सोडवावी तसेच टँकरने पाणीपुरवठा करावा न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत या प्रकरणावरील सुनावणी बुधवार पर्यंत तहकूब केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT