multispeciality toilets sakal
मुंबई

Mumbai News : स्वच्छतागृहात मिळणार आता एटीएम, मोबाइल चार्जिंग, सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन सुविधा

गोरेगावात मल्टिस्पेशालिटी स्वच्छतागृह उभारून नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा एका छत्राखाली देण्यात येणार आहेत.

सकाऴ वृत्तसेवा

गोरेगावात मल्टिस्पेशालिटी स्वच्छतागृह उभारून नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा एका छत्राखाली देण्यात येणार आहेत.

मुंबई - गोरेगावात मल्टिस्पेशालिटी स्वच्छतागृह उभारून नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा एका छत्राखाली देण्यात येणार आहेत. एटीएम, मोबाइल चार्जिंग, स्तनपान सुविधा, सोलर पॅनेल सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन आदी सुविधा या स्वच्छता गृहात असतील. मुंबईतील हा अनोखा प्रयोग असलेले हे स्वच्छतागृह मुंबई महानगर पालिका वर्षभरात बांधणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशांनुसार पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, उप आयुक्त विश्वास शंकरवार आणि उप आयुक्त चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनात हे काम लवकरच सुरू होणार आहे.

गोरेगाव ( पूर्व ) भागातील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विरवाणी इंडस्ट्रियल इस्टेट जवळ मल्टीस्पेशालिटी स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहे. स्त्री, पुरुष व तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र शौचालय सुविधा, महिलांसाठीच्या शौचालयात सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, बाळांना स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष, बाळांचे डायपर बदलण्यासाठी जागा, पिण्याच्या पाण्याची सोय, मोबाइल चार्गिंग स्टेशन आणि पेय पदार्थांसह 'एटीएम'ची देखील सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे शौचालयाच्या छतावर 'सोलर पॅनल' बसविण्यात येणार असून त्यापासून उर्जा निर्मिती करण्यात येणार आहे.

स्वच्छता गृहात सिसिटीव्ही कॅमेऱ्यासह सभोवतालच्या जागेवरती रंगीत फुलांची आकर्षक झाडे लावण्यात येणार आहेत. या शौचालयात पुरूषांसाठी ५ शौचकूप, महिलांसाठी ५ शौचकूप आणि दिव्यांगांसाठी १ शौचकूप असणार आहे. १ हजार ४५३ फूट एवढ्या प्रशस्त जागेमध्ये सर्व सोयींनीयुक्त सार्वजनिक स्वच्छता गृहाची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती 'पी दक्षिण' विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश आक्रे यांनी दिली.

२० मेगावॅट वीजेची होणार निर्मिती

सौर ऊर्जा निर्मिती होण्याच्या दृष्टीने या शौचालयाच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यात येणार आहे. या सोलर पॅनलमधून २० किलोवॅट विजेची निर्मिती होणार आहे. निर्माण होणारी वीज ही विद्युत पुरवठा कंपनीला देण्यात येणार असून विद्युत पुरवठा कंपनीच्या मासिक बिलातून सदर रक्कम वजा केली जाणार आहे. त्यामुळे साहजिकच शौचालयाच्या मासिक खर्चात बचत होण्यासह पर्यावरणपूरक असणार आहे.

१२ महिन्यात काम होणार पूर्ण

मुख्य रस्ते व द्रुतगती महामार्गावर शौचालयाची सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली, तर नागरिकांची गैरसोय होणार नाही. या उद्देशाने या सार्वजनिक स्वच्थता गृहांची उभारणी करण्यात येणार आहे. पालिकेच्या घनकचरा विभागामार्फत या शौचालयाची दैनंदिन स्वच्छता व देखरेख देखील करण्यात येणार आहे. कार्यादेश निघाल्यानंतर १२ महिन्यात या स्वच्छता गृहाचे बांधकाम पूर्ण होईल,

- राजेश आक्रे, सहाय्यक आयुक्त, मुंबई महानगर पालिका

- १ हजार ४५३ फूट एवढी प्रशस्त जागा

- सोलर पॅनलमधून २० किलोवॅट वीजेची निर्मिती

- दिव्यांगांसाठी शौचकूप

- तृतीय पंथीयांसाठीही स्वतंत्र शौचालय सुविधा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST Strike : मुंबईकरांचे हाल... बेस्ट संप दुसऱ्या दिवशीही सुरूच; मेट्रो, रेल्वेत गर्दीच गर्दी

IPL 2027 Trade: रिषभ पंतला पुन्हा दिल्ली कॅपिटल्समध्ये आणण्यात 'दोन' मोठ्या व्यक्तींचा हात; KKR ही होते मैदानात, पण LSGच्या हट्टामुळे Deal फिसकटली

नवी मुंबईत रोजची बत्ती गूल! नागरिक त्रस्त... अखेर महावितरणचा ३६० कोटींचा मास्टर प्लॅन समोर

Sports: जन्मतारीख बदलाच्या नोंदी कायमसाठी जतन करा!; कुस्ती संघटनेची प्राधिकरणाला विनंती; वयचोरी प्रकरणावर चाप लावण्यासाठी पाऊल

Akola: मोर्णा-विद्रुपा पूररेषेचे नवे नकाशे शासनाकडे सादर; आयआयटी मुंबईकडून सॅटेलाईटच्या आधारे अहवाल ; नागरिकांना मिळणार दिलासा

SCROLL FOR NEXT