मुंबई

Video: गोरेगावच्या कोविड सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांचा डान्स

नेस्को कोविड सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांनी लोकप्रिय झिंगाट गाण्यावर केला डान्स

विराज भागवत

नेस्को कोविड सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांनी लोकप्रिय झिंगाट गाण्यावर केला डान्स

मुंबई: राज्यातील कोरोना संसर्ग (Coronavirus) आता हळूहळू आटोक्यात येत आहे. मुंबईसह (Mumbai) राज्यात अनेक ठिकाणी कडक लॉकडाउन (Maharashtra Lockdown) केल्याने आता रूग्णसंख्या (Positivity Rate) वाढीवर काही अंशी नियंत्रण मिळवणं प्रशासनाला (Mumbai BMC) शक्य झालं आहे. कोरोना काळात विविध ठिकाणची कोविड सेंटर्स ही चांगल्या वाईट कारणांसाठी चर्चेत आली. सध्या मुंबईतील गोरेगाव (Goregaon) येथील नेस्को कोविड सेंटरची (Nesco Covid Center) जोरदार चर्चा रंगली आहे. या चर्चेमागचे कारण खूपच सकारात्मक (Positive) आणि आनंददायी (Happy) आहे. या कोविड सेंटरमधील कर्मचारी वर्ग डान्स (Filmy Dance) करतानाचा एक व्हिडीओ खूपच व्हायरल झाला आहे. त्या डान्समागचं कारणही तितकंच भन्नाट असून सर्वत्र याच व्हिडीओची चर्चा रंगली आहे. (Mumbai Goregaon Nesco Covid Center Health Workers dance on Zingat Song Sairat Movie Video Viral)

मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या नेस्को कोविड सेंटरला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. याच गोष्टीचं निमित्त साधून नेस्कोमध्ये एक मनोरंजनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मनोरंजनाच्या कार्यक्रमा दरम्यान आरोग्य कर्मचारी झिंगाट या गाण्यावर डान्स करताना दिसले. मुंबईतील नेस्को कोविड सेंटर सुरू होऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. २ जूनला नेस्को कोविड सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी पीपीई परिधान करून पेशंट्सचं मनोरंजन केलं आणि झिंगाट या लोकप्रिय गाण्यावर डान्स केला.

गेल्या दीड वर्षापासून आरोग्य कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात ताण तणाव आहे. आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स सारेच दिवसरात्र एक करून रुग्णांवर उपचार करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसात रूग्णसंख्या घटली आहे. त्यामुळे सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण काही अंशी कमी झाल्याचे चित्र आहे. नेस्को कोविड सेंटरमधील हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे दिसत आहे. त्याशिवाय, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दिवसरात्र सुरू असलेल्या कार्याबद्दल त्यांचे आभारही व्यक्त केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT