Minor Hostel girls in Mumbai Sakal
मुंबई

Mumbai: टॉयलेटची खिडकी तोडून शासकीय हॉस्टेलमधून ६ अल्पवयीन मुली पळाल्या!

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतल्या गोवंडी भागातल्या शासकीय हॉस्टेलमधून ६ मुली पळून गेल्याची घटना घडली. ११ सप्टेंबरला पहाटे पाचच्या सुमारास या मुली पळून गेल्या आहेत. टॉयलेटचं ग्रील आणि खिडकी तोडून या मुली पळून गेल्याने खळबळ माजली आहे.

हॉस्टेलच्या अधिकाऱ्यांना या मुली पळून गेल्याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी या घटनेचा तपास केला. त्यानंतर या मुलींची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्या माहितीवरुन पोलिसांनी या मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या सहा मुली अल्पवयीन आहेत. या मुलींना पळून जाण्यास कोणी मदत केली, त्या कशा पळून गेल्या, या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे, या सगळ्याचा पोलीस शोध घेत आहेत.

गोवंडीच्या या हॉस्टेलमध्ये मानवी तस्करी, भिकारी, बेकायदेशीर कामं, अशा काही ठिकाणी सापडलेल्या मुलींना सोडवून इथं ठेवलं जातं. त्यामुळे या मुलींच्या पळून जाण्यामागे काय उद्देश आहे, याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT