मुंबई

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढणार! मुंबई हायकोर्टानं फेटाळली याचिका

मुंबई भेटीदरम्यान त्यांच्या एका कृतीमुळं त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई हायकोर्टानं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना झटका दिला आहे. आपल्याविरोधातील तक्रार रद्द करण्यात यावी यासाठी त्यांनी दाखल केलेली याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यामुळं ममतांच्या अडचणी वाढणार आहेत. (Mumbai HC dismissed WB CM Mamata Banerjee application in National anthem insult case)

गेल्या वर्षी मुंबई भेटीदरम्यान ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा अपमान केला होता. याप्रकरणी त्यांच्याविरोधात भाजप नेते विवेकानंद गुप्ता यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. ही तक्रार रद्द व्हावी यासाठी त्यांनी हायकोर्टात अर्ज दाखल केला होता, हा अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे.

हे ही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

प्रकरण काय आहे?

गेल्यावर्षी मुंबई दौऱ्यावर असताना ममता बॅनर्जी यांनी एका कार्यक्रमात खाली बसूनच राष्ट्रगीताला सुरुवात केली. तसेच राष्ट्रगीत सुरू असताना त्या मध्येच थांबल्या. त्यामुळं राष्ट्रगीताचा अपमान होतो, असा युक्तीवाद करत भाजपचे मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी मुंबई पोलिसांत ममता बॅनर्जीविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी भाजप नेत्यांनी कोर्टात ममता बॅनर्जीविरोधात याचिका दाखल केली. यावर ममता बॅनर्जी यांना शिवडी न्यायालयाकडून समन्सही बजावण्यात आलं होतं. ममता बॅनर्जींना 2 मार्च 2022 रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश कोर्टानं दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT