Naturals-Ice-Cream 
मुंबई

'नॅचरल्स' नावाने आईसक्रीम विकण्यास गुजरातच्या कंपनीला मनाई

'नॅचरल्स' नावाने आईसक्रीम विकण्यास गुजरातच्या कंपनीला मनाई मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश; वाचा नक्की काय आहे प्रकरण Bombay HC grants interim relief to owner of Naturals ice cream in trademark case vjb 91

- सुनीता महामुणकर

मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश; पुढील सुनावणी सप्टेंबरमध्ये

मुंबई: नॅचरल्स आईसक्रीम या नावाने आईस्क्रीम किंवा अन्य उत्पादन विकण्यास मुंबई उच्च न्यायालयाने गुजरातमधील कंपनीला मनाई केली आहे. मूळ नॅचरल्स आईस्क्रीम कंपनीचे प्रमुख रघुनंदन कामत यांनी वडोदरा येथील मंजलपूरमधील नॅचरल्स आईस्क्रीम कंपनी विरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे. नॅचरल्स हा ट्रेडमार्क गैरप्रकारे वापरून ट्रेडमार्क नियमांचे उल्लंघन कंपनीने केले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, तब्बल १५० कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मागणीही त्यांनी केली आहे. (Mumbai HC grants interim relief to owner of Naturals ice cream in trademark case)

या याचिकेवर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात एक सदस्यीय खंडपीठाच्या न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्यापुढे सुनावणी झाली. कामत यांनी सन 1984 मध्ये नॅचरल्स या नावाची नोंदणी केली आहे. तब्बल 48 लाख किलो आईस्क्रीमची विक्री असून देशात 130 फ्रैंचायजी आहेत. कंपनीची सन 2019-20 ची वार्षिक उलाढाल 312 कोटी रुपये आहे. असे असताना गुजरातमधील कंपनी सन 1992 पासून या नावाचा वापर करत आहे असे न्यायालयात सांगण्यात आले.

न्यायालयाने तूर्तास पुढील सुनावणीपर्यंत प्रतिवादी कंपनीला नॅचरल्स हे नाव व्यापार किंवा उत्पादनासाठी वापरण्यास मनाई केली आहे. याचिकेवर पुढील सुनावणी 9 सप्टेंबरला होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT