Mumbai Heavy Rains 
मुंबई

Mumbai Heavy Rains: मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय! अंधेरी सबवे बंद, 12 हून अधिक मार्गांवर बसेस वळवल्या

Sandip Kapde

Mumbai Rain Update : महाराष्ट्रातील बहुतांश शहरांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई शहर जलमय झाले आहे. मुंबईतील अनेक भागात सकाळी मुसळधार पावसाची नोंद झाली. कुर्ला, चेंबूर, अंधेरी या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे, त्यामुळे अंधेरी भुयारी मार्ग काही काळासाठी बंद करण्यात आला आहे.

बसेस वळवण्यात आल्या

मुंबईत मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे बृहन्मुंबई इलेक्ट्रिक अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) लिमिटेडने 12 हून अधिक मार्गांवर बसेस वळविल्या आहेत. नवभारतने याबाबत वृत्त दिले आहे. मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अंधेरी आणि दहिसर भुयारी मार्गावर काही काळ पाणी साचले होते. सध्या उपनगरीय लोकल ट्रेनचे नेटवर्क सामान्यपणे सुरू आहे.

100 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे

सांताक्रूझ वेदर ब्युरो येथे शुक्रवारी 9 तासांत 100 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. IMD नुसार, शुक्रवारी सकाळी 8.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत उपनगरात सरासरी 115.2 मिमी पावसाची नोंद झाली, तर (कुलाबा वेदर ब्युरो) शहरात सरासरी 92.2 मिमी पावसाची नोंद झाली.

आज काल आज (शनिवार) सकाळी ८ वाजेच्या कालावधीत मुंबई महानगरातील सरासरी पाऊस:

मुंबई शहर- ८२.८९ मिमी.
पूर्व उपनगरे- १४८.४० मिमी.
पश्चिम उपनगरे- १२२.३० मिमी.

अंधेरी सबवे जलमय-

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा अंधेरी सबवे देखील जलमय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला ये जा करणाऱ्या वाहन चालकांना आणि नागरिकांना या ठिकाणाहून जाण्यास वाहतूक पोलिसांनी बंदी केली आहे. सध्या पाऊस जरी थांबला असला तरी सबवेतील पाणी ओसरण्यास काहीसा वेळ लागणार आहे त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Shirampur Murder: जेवण उशिरा मिळाल्याचा वाद जीवावर बेतला; हॉटेल मालकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूर हादरले!

Latest Marathi News Update: आदिती तटकरे पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन सहभागी

Social Service Initiative: भिवधानोरा-पंढरपूर दिंडीतील वारकऱ्यांना तुकाराम सटाले यांच्याकडून रेनकोट वाटप; सेवाभावी उपक्रमाचे कौतुक

Davdi Free Eye Camp: दावडीत दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया; २ हजारांहून अधिक रुग्णांना नवदृष्टी

SCROLL FOR NEXT