मुंबई

सासरच्यांविरोधात बोगस आरोप करणं सुनेला पडलं महागात, न्यायालयाने काय केलं वाचा

- सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 2 : सासू सासऱ्यांविरोधात खोटे किंवा बिनबुडाचे बोगस आरोप करणे एका सुनेला चांगलंच महागात पडलंय. मुंबई उच्च न्यायालयात सुनेने दाखल केलेली फौजदारी फिर्याद रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

तब्बल तीन वर्षानंतर दंडाधिकारी न्यायालयात कौटुंबिक छळाची तक्रार दाखल केली. त्यानंतर सुनेने सासू आणि सासऱ्यांविरोधात केलेले आरोप निराधार असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

न्यायालयाने सुनेला तक्रार उशिरा का दाखल केली याबाबत विचारणा केली. मात्र तक्रारदार सुनेकड़ून पुरेसे स्पष्टीकरण मिळालं नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत फौजदारी कारवाई चालविणे योग्य ठरत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आणि गुन्हा देखील रद्द केला.

नक्की प्रकरण आहे तरी काय ? 

जुलै 2010 ते मे 2011 या दरम्यान सासरची मंडळी आणि पती माझा छळ करत होती अशी तक्रार पत्नीने सन 2014 मध्ये केली होती. मात्र त्यापूर्वीच ती घर सोडून निघून गेली होती, असे उघड झाले आहे. पतीने दुसरे लग्न केल्यानंतर पत्नीने ही तक्रार केली होती.

तसेच सासरच्यांनी तिच्याकडून हुंडा म्हणून पैसे आणि महागड्या वस्तू मागितल्याचा आरोपही सुनेकडून केला गेलेला. मात्र त्याबाबतचे विशिष्ट प्रसंग, दिवस किंवा महिना सुनेला न्यायालयात सांगता आला नाही. त्यामुळे या आरोपातही तथ्य नाही, असे निरीक्षण न्या. झेड ए. हक आणि न्या . अमित बोरकर यांच्या खंडपीठाने नोंदविले. घर बांधण्यासाठी सात लाख सासरच्या लोकांनी मागितले असा आरोप सुनेने केला होता.

mumbai high court demised case filed by women against her in laws

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

IND vs AFG: वैभव संजू ईशान श्रेयस सगळे तयार, मग तिलक वर्माचं काय? AB डिव्हिलियर्सने टीम इंडियासमोर उभा केला मोठा पेच, ‘तो कुठे खेळणार?

मराठ्यांनी ठरवायंच, नेत्याला मोठं करायचं की लेकराबाळांना; जरांगे पाटील रडले

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

‘गुजरात बांग्लादेशात आहे की पाकिस्तानात?’ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाण बदलावर परेश रावलांचा संताप

SCROLL FOR NEXT