मुंबई: खासदार संजय राऊत (sajnay raut) यांच्या विरोधात गंभीर आरोप करणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञ महिलेने केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) आज फेटाळली. यामुळे राऊत यांना दिलासा मिळाला आहे. पश्चिम उपनगरात राहणाऱ्या चित्रपट निर्मात्या स्वप्ना पाटकर (swapna patkar) यांनी न्यायालयात तीन याचिका केल्या होत्या. राऊत यांनी सन 2013 आणि 2018 मध्ये माझ्या पतीच्या संगनमताने मला आणि माझ्या कुटुंबियांना जीवे मारण्याचे कारस्थान रचले.
याची पोलीस फिर्याद वाकोला आणि माहीम पोलीस ठाण्यात केली पण त्याची दखल घेतली नाही. कारण राऊत यांनी राजकीय दबाव आणला असा आरोप याचिकेद्वारे पाटकर यांनी केला होता. तसेच पाटकर यांनी बोगस पदवी मिळवून मागील दोन वर्षे सिटी रुग्णालयात काम करतात असा गुन्हा मुंबई पोलिसांनी दाखल केला आहे. यामध्ये पाटकर यांना अटक देखील झाली होती.
हा गुन्हा रद्द करण्यासाठी देखील त्यांनी एड आभा सिंह यांच्यामार्फत याचिका केली होती. पोलिसांनी खोटे आरोप केले आहेत असा बचाव त्यांनी केला होता. न्या एस एस शिंदे आणि न्या एन जे जमादार यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली होती. राऊत यांच्या वतीने एड पी के धाकेफाळकर यांनी सर्व आरोपांचे खंडन केले होते.
आज न्यायालयाने याचिकांवर निकाल जाहीर केला. संबंधित मुद्यांसाठी पाटकर यांनी दंडाधिकारी न्यायालयात दाद मागावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आणि याचिका नामंजूर केली. पोलिसांनी दंडाधिकारी न्यायालयात या तक्रारींवर ए समरी अहवाल दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.