मुंबई

हायकोर्ट म्हणतंय, बलात्काराच्या खटल्यात डीएनए एकमेव पुरावा नाही

- सुनीता महामुणकर

मुंबई : बलात्काराच्या खटल्यांमध्ये डीएनए चाचणी हाच एकमेव पुरावा नसतो, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. पिडित मूकबधिर मुलीच्या बाळाचा डीएनए दोषी आरोपीच्या डीएनएशी जुळला नाही म्हणून जामीन द्यावा, ही आरोपीची मागणीही न्यायालयाने धुडकावली.

अल्पवयीन पिडित तक्रारदार मुलीचे वडील आरोपी नसल्याचा वैद्यकीय अहवाल देण्यात आला आहे. मूकबधिर असलेल्या मुलीवर फेब्रुवारी 2018 मध्ये आरोपीने बलात्कार केला होता. मात्र त्यानंतर काही महिन्यात तीचा विवाह अन्य व्यक्तीबरोबर झाला. लग्नाच्या दरम्यान ती गर्भवती असल्याचे उघड झाले. त्यामुळे नवर्राने तीला पुन्हा माहेरी ठेवले. तिच्या बाळाच्या डीएनएची चाचणी आरोपीच्या डीएनएबरोबर करण्यात आली होती. मात्र ही चाचणी जुळली नाही आणि संबंधित बाळ आरोपीचे नसल्याचे ही स्पष्ट झाले. 

आरोपी विरोधात लातूर जिल्हा न्यायालयात पॉस्को कायद्याअंतर्गत खटला चालविण्यात आला होता. यामध्ये आरोपीला दोषी ठरवून दहा वर्ष सक्तमजुरीची सजा सुनावण्यात आली. मात्र डीएनएचा पुरावा ग्राह्य झाला नाही, त्यामुळे शिक्षा स्थगित करावी आणि
तूर्तास मला जामीन मंजूर करावा, आणि अपील मंजूर करावे, अशी मागणी औरंगाबाद उच्च न्यायालयात आरोपीने याचिकेद्वारे केली होती.

या याचिकेला राज्य सरकारच्या वतीने विरोध करण्यात आला. डीएनए जुळला नाही म्हणून बलात्काराचा आरोप सिद्ध होत नाही, असे नाही. आरोपीने पिडित मुलीच्या मूकबधिर असण्याचा फायदा घेतला आणि तिच्यावर अत्याचार केले याचे घटनात्मक पुरावे आहेत, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. न्या विभा कनकवाडी यांनी हा युक्तिवाद ग्राह्य धरला. जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार डीएनए चाचणी हा एकमेव पुरावा नसून अन्य पुरावे ही महत्त्वाचे असतात.

पिडित मुलीने आरोपीविरुद्ध जबाब दिलेला आहे. जेव्हा जबाब आणि वैद्यकीय अहवाल यापैकी एकाचा विचार करावा लागतो तेव्हा जबाब महत्त्वाचा असतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आणि जामीन नामंजूर केला.

( संपादन - सुमित बागुल ) 

mumbai high court on DNA and inappropriate behavior with women 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Noise : पुण्यात डीजेपुढे पोलिस हतबल!, पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट अन् दादागिरीची भाषा; ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’

विद्यार्थिनीवर कथित अत्याचाराचा मेसेज व्हायरल; विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केली तोडफोड, राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला

IND vs WI, 1st ODI Weather : पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा येणार? तिरुअनंतपुरममध्ये कसे आहेत हवामान अंदाज, घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : ही लोकशाहीची हत्या : संजय राऊत

Theatre and Memories : नाटक संपतं, पण वस्तूंच्या आठवणी राहतात; ‘बेगम बर्वे’पासून ‘गोदो’पर्यंतचा रंगानुभव

SCROLL FOR NEXT