Mumbai High Court
Mumbai High Court Sakal media
मुंबई

परदेशी नागरिकांसाठी सुनिश्चित मार्गदर्शक तत्त्वे कोणती? हायकोर्टाकडून विचारणा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (corona) देशात येणाऱ्या परदेशी नागरिकांना (Foreigner's) आणि परदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी राज्य सरकारने (mva government) सुनिश्चित मार्गदर्शक तत्त्वे (SOP) आखली आहेत का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने (mumbai high court) केली आहे.

परदेशी नागरिकत्व असलेल्या वडिलांना त्यांच्या मुलाला कॉफी शॉपमध्ये दोन तास भेटण्याची परवानगी न्यायालयाने नुकतीच दिली. मूळ भारतीय असलेले ग्रीन कार्डहोल्डर यांनी त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी न्यायालयात याचिका केली. २०१९ मध्ये त्यांनी आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून मुलाला जन्म दिला. याचिकादारांची पत्नी मुलाला आई-वडिलांसह घेऊन भारतात परत आली होती. त्यानंतर मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे वडीलही आले, पण त्यांना न भेटताच पत्नी मुलाला घेऊन अन्यत्र निघून गेली. यामुळे वडिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

याचिकेवर न्या. नितीन जामदार आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मुलाचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी पालकांनी काळजी घ्यायला हवी, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. अमेरिकन न्यायालयानेही पत्नीला मुलासह न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. मला न सांगता पत्नी मुलाला घेऊन भारतात निघून आली, अशी तक्रार वडिलांनी केली आहे. याचिकेवर पुढील सुनावणी २८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या वेळी खंडपीठाने परदेशात जाणाऱ्या आणि देशात येणाऱ्या नागरिकांसाठी काय सुनिश्चित मार्गदर्शक तत्त्वे आखली आहेत, याचा तपशील दाखल करण्याचे निर्देश सरकारी वकिलांना दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT