high_court_ 
मुंबई

परवानाधारी कत्तलखान्यांमध्येच बोकड कटाई केली जाईल याची खातरजमा करावी - हायकोर्ट

- सुनीता महामुणकर

 मुंबई : खासगी सोसायटी आणि जागांमध्ये बकऱ्यांची कत्तल करण्यास  मनाई असून मुंबई महापालिकेने निर्धारित केलेल्या परवानाधारी कत्तलखान्यांमध्येच बोकड कटाई केली जाईल, याची खातरजमा करावी, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. आगामी ईदच्या पार्श्वभूमीवर हे आदेश महत्त्वाचे आहेत.

देवनारमधील परवानाधारी कत्तलखान्यांशिवाय अन्य खासगी जागांमध्ये बकऱ्यांची कत्तल करण्यास उच्च न्यायालयाने यापूर्वी मनाई केली आहे. या निकालाच्या अनुषंगाने सांताक्रूझ येथील नागरिक राजेशकुमार कनौजिया यांनी एड विवेक शुक्ला यांच्यामार्फत न्यायालयात याचिका केली आहे. कोरोना साथीमध्ये मटणाच्या दुकानांमध्ये बोकड कटाईला मनाई करावी, अन्यथा तिथे ग्राहकांची गर्दी होऊन लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडेल, अशी शक्यता याचिकादारांनी व्यक्त केली आहे. याचिकादार राहात असलेल्या इमारतीमध्ये तळमजल्यावर मटण विक्रीचे दुकान आहे. मात्र येथे सर्रासपणे कटाईदेखील केली जाते आणि स्वच्छता पाळली जात नाही, असा आरोप याचिकादाराने केला आहे. शहर उपनगरात असे अनेक खाटीकखाने विनापरवाना सुरु असतील, आणि त्याच्या कचऱ्याचीही व्यवस्थित विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो असे शुक्ला यांनी सांगितले.

न्या. शाहरुख काथावाला आणि न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी व्हिडीओ कौनफरन्सिंगमध्ये यावर सुनावणी झाली. माझ्याकडे महापालिकेचा परवाना आहे, असा दावा दुकानचालकाकडून सुनावणीमध्ये करण्यात आला. मात्र हा दावा महापालिकेकडून अमान्य करण्यात आला. संबंधित दुकान चालकाला केवळ देवनार कत्तल खान्यातून आलेले मटण विक्रीची परवानगी आहे, ते साठविण्याची अथवा बोकड कटाईची परवानगी नाही, असे महापालिकेच्या वकील उर्जा धोंड यांनी सांगितले. केवळ परवाना असलेल्या खाटिकांनाच बोकड कटाई करण्यासाठी परवानगी दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.

याची नोंद घेऊन खंडपीठाने दुकान चालकाला इमारत परिसरात बोकड कत्तल करण्यासाठी मनाई केली आहे. ईदमध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात कुर्बानीसाठी बोकड विकत घेतात. मात्र यंदा कोविड 19 मुळे राज्य सरकारने ईदसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT