Mumbai High Court sakal media
मुंबई

राज्य सरकारने रुग्णालयांच्या सुरक्षेचा लेखी तपशील दाखल करावा- हायकोर्ट

सुनिता महामुनकर

मुंबई : रुग्णालयांंच्या सुरक्षेसाठी (hospital protection) आतापर्यंत न्यायालयाने वेळोवळी दिलेल्या निर्देशांची अमंलबजावणी (following orders) राज्य सरकारने (Maharashtra government) कशाप्रकारे केली आहे, याचा लेखी तपशील (written details) दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) राज्य सरकारला दिले. (Mumbai high court-Maharashtra government-following orders-written details-hospital protection-nss91)

कोविड 19 चा संसर्ग झालेल्या रुग्णांना ठेवलेल्या रुग्णालयात आग लागल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर न्यायालयाने यासंबंधी दाखल केलेल्या जनहित याचिकांवर अनेकदा सुरक्षेसंबंधितचे निर्देश दिले आहेत. सोमवारी मुख्य न्या दिपांकर दत्ता आणि न्या गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. आग लागण्याच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी राज्य सरकारने कोणत्या प्रतिबंधक उपाय योजना सुरू केल्या आहेत, यावर प्रतिज्ञापत्र दाखल करा, असे निर्देश न्यायालयाने दिले.

दर सहा महिन्यात अग्निशमन सेवा संचालनालयाकडून प्रत्येक रुग्णालयाला ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते, असे निर्देश यापूर्वी न्यायालयाने दिले आहेत. मात्र या नियमांची पूर्तता होत नाही, असा दावा याचिकादारनिलेश नवलाखा यांच्या वतीने एड राजेश इनामदार यांनी खंडपीठापुढे केला. प्रत्येक कोविड रुग्णालयात एक नोडल अधिकारी नियुक्त असणे आवश्यक असून आग प्रतिबंधक विभागाअंर्तगत दर महिन्याला फायर औडिट करणे आवश्यक आहे असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, अशी माहिती इनामदार यांनी दिली.

राज्य सरकारने संबंधित नियमांमध्ये सुधारणा केली असून रुग्णालय नोंदणीसाठी काही निकष बंधनकारक केले आहेत, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली. यामध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा उभारणे, औडिट करणे, आग प्रतिबंधक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र असणे इ तरतुदी आहेत. जर हे प्रमाणपत्र नसेल तर नोंदणी किंवा नूतनीकरण होऊ शकत नाही, असे सांगण्यात आले. याचिकेवर पुढील सुनावणी औगस्ट अखेरीस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: इलेक्ट्रिशियनच्या लेकीने भारतासाठी जिंकलं पदक! ज्ञानेश्वरी यादवने गरिबीचा 'भार' झुगारून घडवला इतिहास, तिरंग्यासमोर नतमस्तक

Pune Police: पुण्यात पोलिसांनीच टाकला दरोडा? एक कोटींची कॅश लुबाडण्यासाठी नवले पुलावर केलं कांड; 'असा' झाला भांडाफोड

Latest Marathi News Live Update: बंडखोर खासदारांवरील अपात्रतेच्या याचिकांचा त्वरित निपटारा करण्याची विनंती केली

‘धुरंदर’नंतर ‘एलिना’ची ताडोबातून ज्ञानगंगा अभयारण्यात एन्ट्री, व्याघ्र संवर्धनाला मिळणार आणखी बळ

Ambulance Fare: आता रुग्णवाहिकांमध्ये शासकीय भाडे, रुग्णांची लूट करणाऱ्यांना चाप; कसे असतील नवे दर?

SCROLL FOR NEXT