Mumbai High Court rejects Act Of God's claim, orders compensation of 40 lakhs in accidental death case. Esakal
मुंबई

इन्शुरन्स कंपनीला दणका! Act Of God चा दावा हायकोर्टाने फेटाळला, अपघाती मृत्यूप्रकरणी 40 लाखांची भरपाई देण्याचे आदेश

Accident Compensation: न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले 'ॲक्ट ऑफ गॉड' अशा गोष्टी असतात ज्याचे नियंत्रण मणसाच्या हाती नसते. त्यामुळे ते या प्रकरणात लागू होत नाही.

आशुतोष मसगौंडे

मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक निर्णय देत अपघात ही 'देवाची कृती' (Act Of God) असल्याचे नाकारला. त्याचबरोबर संबंधित प्रकरणात मुंबई मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचा निर्णयही रद्द केला. त्याचबरोबर अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला न्यायालयाने 40 लाख रुपयांची भरपाई मंजूर केली.

न्यायाधिकरणाने यापूर्वी दैवी हस्तक्षेपाचे कारण सांगून एका भीषण रस्ते अपघातातचा बळी ठरलेल्या पीडित व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसान भरपाई नाकारली होती. या निकालाला आव्हान देत पीडित कुटुंबाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायमूर्ती एएस चांदूरकर आणि जितेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली, न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले 'ॲक्ट ऑफ गॉड' अशा गोष्टी असतात ज्याचे नियंत्रण मणसाच्या हाती नसते. त्यामुळे ते या प्रकरणात लागू होत नाही.

यावेळी न्यायालयाने निरिक्षण नोंदवले की, वाहनांचे अपघात एक किंवा दोन्ही वाहनचालकांच्या निष्काळजीपणा अथवा चुकीमुळे होता. अशात अपघातावेळी कोणाचीतरी एकाची चूक असतेच.

या घटनेत राज्य परिवहन महामंडळाची बस (एसटी) आणि मारुती कार यांच्यात धडक झाली, ज्यात पीडित व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

या घटनेबाबतचे सर्व पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने असे मानले की, या प्रकरणात मुंबई मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचा निष्कर्ष सदोष आहे.

प्रतिकूल हवामानाचा किंवा इतर कोणताही अनियंत्रित घटक या अपघाताला कारणीभूत असल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे ही दुर्घटना 'देवाची कृती' होती असे म्हणणे अन्यायकारक ठरेल.

अशा घटनांमध्ये जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित करून न्यायालयाने दोन्ही चालकांना एका मर्यादेपर्यंत जबाबदार धरले.

यावेळी न्यायालयाने मारुती कारच्या विमा कंपनीने आणि एसटी महामंडळाने पीडित कुटुंबाला 6% व्याजासह 40 लाख 34 हजारांची नुकसानभरपाई संयुक्तपणे देण्याचे निर्देश दिले.

या प्रकरणातील पीडित राजेश शेजपाल रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये डेप्युटी फायनान्स मॅनेजर म्हणून काम करत होते. 14 नोव्हेंबर 1997 रोजी ते आपल्या सहकाऱ्यांसोबत मारूती कारमधून प्रवास करत होते. तेव्हा एसटी महामंडळाच्या बसने त्यांच्या कारला धडक दिली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT