मुंबई

'निवृत्तीवेतनावर कर्मचाऱ्यांचा मूलभूत अधिकार' म्हणत हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

- सुनीता महामुणकर

मुंबई : निवृत्तीवेतनावर कर्मचाऱ्यांचा मूलभूत अधिकार असतो आणि त्यामध्ये कोणत्याही कारणाने कपात होता कामा नये, असा महत्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या निकालामुळे ८५ वर्षाच्या निवृत्त कर्मचाऱ्याला दिलासा मिळाला आहे. राज्य घटनेच्या अनुच्छेद 300 अ नुसार निवृत्ती वेतन ही कर्मचाऱ्यांची मालमत्ता असते, आणि अनुच्छेद 21 नुसार उदरनिर्वाह करण्याचा मूलभूत अधिकार आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. कोणत्याही कायदेशीर आधाराविना परस्पर सेवानिवृत्ती वेतनातून रक्कम कमी करता येणार नाही, असे न्या. रवी देशपांडे आणि न्या एन बी सूर्यवंशी यांच्या खंडपीठाने निकालामध्ये स्पष्ट केले आहे.

नागपूरमधील निवासी एन गोपाळ एका फटाके बनविणाऱ्या कंपनीमधून सन 1995 मध्ये सहाय्यक फोरमन म्हणून निवृत्त झाले. त्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या केन्द्रीय सेवानिव्रुत्ती कार्यवाही केन्द्रामधून निव्रुत्ती वेतन मिळत होते. मात्र केन्द्राने त्यांच्या वेतनामधून प्रती महिना 11 हजार रुपये कपात करण्यास प्रारंभ केला होता. याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे याचिका केली होती.

याचिकादाराच्या खात्यामध्ये तांत्रिक चुकिमुळे औक्टोबर 2007 पासून 782 रुपये दर महिना जादा जमा झाले होते. त्यामुळे सुमारे तीन लाख 69 हजार रुपयांची चुकून जमा झालेली रक्कम पुन्हा काढून घेण्यासाठी रक्कम कापली, असा युक्तिवाद बैकेच्या वतीने करण्यात आला होता. मात्र हा युक्तिवाद न्यायालयाने अमान्य केला. कंपनीच्या वतीनेही सेवानिवृत्त वेतनाबाबत निश्चित केलेली रक्कम योग्य असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने केंद्राचा युक्तिवाद अमान्य केला.

तांत्रिक चुक झाल्याबाबतचा कोणताही पुरावा केंद्राच्या वतीने दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे कायदेशीर आधार नसताना निवृत्ती वेतनामधून पैसे कापता येणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. तसेच ज्येष्ठ नागरिकाबरोबर असंवेदनशीलपणे व्यवहार केल्या बद्दल ही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. आतापर्यंत घेतलेली रक्कम परत करा आणि नुकसान भरपाई म्हणून पन्नास हजार रुपये याचिकादाराच्या खात्यात जमा करा, असे आदेश खंडपीठाने बैकेला दिले.

( संपादन : सुमित बागुल )

mumbai high court says retirement funds is sole property of employee

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे महापालिकेची प्रभाग रचना आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला

Pune News : पूर्ण व्यवहार रद्द होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार; आचार्य गुप्तीनंदीजी महाराज यांचा इशारा

Lightning Strike : गेवराईत वीज पडल्याने दोन शेतमजूर महिला जखमी

Electricity Shock : एमआयडीसीत सेल्को एक्स्ट्रुजन कंपनीत विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू

Shreyas Iyer बरा होतोय...! ICU मधून बाहेर, वाचा काय आहेत नवे अपडेट्स

SCROLL FOR NEXT