Hindustani bhau vikas pathak sakal media
मुंबई

विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी का भडकावले? हायकोर्टाने हिंदुस्थानी भाऊला फटकारले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना (ssc-hsc students) ऑनलाईन परीक्षेकरिता (online exam) आंदोलनासाठी भडकावल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या यू-ट्युब व्लॉगर (You tube vloger) हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास पाठकला (vikas pathak) मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फैलावर घेतले. विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी का भडकावले, असा सवाल उपस्थित करत त्याला चांगलेच फटकारले.

काही दिवसांपूर्वी परीक्षा ऑफलाईनऐवजी ऑनलाईन घेण्याची मागणी करत राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत पाठकला १ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. दंडाधिकारी न्यायालयाने त्याला नोटीस बजावत त्याच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई का करू नये, अशी विचारणा करत स्पष्टीकरण मागितले होते.

स्पष्टीकरण दंडाधिकाऱ्यांना न पटल्यास त्याच्याकडून भविष्यात सामाजिक एकात्मतेला बाधा निर्माण होईल, अशा प्रकारचे कृत्य करणार नाही, असे हमीपत्र लिहून द्यावे लागणार आहे. पाठकने नोटिशीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर सोमवारी न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

संबंधित याचिका निराधार असल्याचे सरकारी वकिलांनी सांगत अर्जाला विरोध केला. त्याची दखल घेत, तुम्ही विद्यार्थ्यांना सोशल मीडियाच्या मदतीने एकत्र जमण्यास सांगितले. हे तरुण विद्यार्थी असून ज्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सहजपणे प्रभावित केले जाऊ शकते. विद्यार्थ्यांना अशा प्रकारे शिक्षण मंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचे आवाहन करणे चुकीचे आहे, असे खंडपीठाने स्पष्ट करत नाराजी व्यक्त केली. दंडाधिकाऱ्यांना हिंदुस्थानी भाऊविरोधात सुरू करण्यात आलेल्या ‘प्रतिबंधात्मक कारवाई’अंतर्गत कोणताही अंतिम आदेश न देण्याचे निर्देश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flood Alert Kolhapur : कोल्हापुरात पाऊस थांबला तरीही पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल, आलमट्टीतून विसर्ग वाढला

CIBIL Score: तुमचा CIBIL आताच सुधारा, जर तुमचा सिबिल खराब असेल तर नोकरीही मिळणार नाही

Viral video : धावत्या एसटी बसमध्ये मद्यधुंद कंडक्टरचा राडा, ड्रायव्हरने बस थांबवली अन्... व्हिडिओ व्हायरल

Rain-Maharashtra Latest Live News Update: गेल्या २४ तासांत घाट क्षेत्र आणि उत्तर कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद

Sickle Cell Patients in Crisis: सिकलसेल रुग्ण संकटात; डागा रुग्णालयात हायड्रॉक्सीयुरियाचा तुटवडा, उपचाराऐवजी रुग्णांना दाराबाहेर

SCROLL FOR NEXT