मुंबई

Mumbai High Court: खड्डे बुजवण्यासाठी आतापर्यंत काय केले? महामुंबईतील पालिकांना न्यायालयाचा सवाल

Latest Marathi News: खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधणाऱ्या मूळ जनहित याचिकेवर नव्याने सुनावणी घेतली जाईल, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: मुंबई महानगरातील खड्डे आणि उघड्या मॅनहोल्सच्या प्रश्नावरून मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अवमान याचिकेची न्यायालयाने मंगळवारी (ता. ८) दखल घेतली. खड्डे बुजवण्यासाठी तसेच मॅनहोल्सप्रकरणी गेल्या सहा वर्षांत काय केले, असा सवाल करत मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित सर्व पालिका प्रशासनांना दिले.

मुंबई महापालिकेसह एमएमआरडीए हद्दीतील इतर पालिकांच्या रस्त्यांवर खड्डे पडले असून मॅनहोल्सचीही दुरवस्था झाली आहे. न्यायालयाने याबाबत आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने ॲड. रुजू ठक्कर यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज (ता. ८) मुख्य न्या. देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधणाऱ्या मूळ जनहित याचिकेवर नव्याने सुनावणी घेतली जाईल, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले.

याच वेळी महापालिकांना गेल्या सहा वर्षांत न्यायालयाच्या निर्देशांना अनुसरून कोणती पावले उचलली, याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ने नागरिकांना दिलेले मूलभूत हक्क, जनतेचे हित तसेच खड्ड्यांच्या प्रश्नाचे गांभीर्य विचारात घेऊन आम्ही सहा वर्षांपूर्वीची सुओमोटो जनहित याचिका पुन्हा सुनावणीला घेत आहोत.

त्या याचिकेवर न्यायालयाने २०१८मध्ये विविध निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने सहा वर्षांत कोणती पावले उचलली, याचा सविस्तर अहवाल महापालिकांनी आठ आठवड्यांत सादर करावा, असे खंडपीठाने नमूद केले. अवमान याचिकेवर आदेश देण्यास काही मर्यादा येतात. त्यामुळे अवमान याचिका निकाली काढून मूळ जनहित याचिका पुन्हा सुनावणीसाठी घेतल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने ३ डिसेंबरपर्यंत सुनावणी तहकूब केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara IT Park : कोल्हापूर-साताऱ्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, म्हसवड MIDC साठीही तब्बल 500 कोटी; मंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय

Satara District bank Election : सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत मंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांचा सावध पवित्रा

Uday Samant : यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यात स्वतंत्र अनुवाद समिती स्थापन करणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

वरिष्ठ IAS अधिकारी बेपत्ता, मोबाईही बंद; शेवटचं लोकेशन बंगळुरु विमानतळावर

Nagpur News : नऊ दिवसांपासून नवजात बालिकेच्या शोधात फिरत होती महिला; मुलगी मेल्याने होती अस्वस्थ, रिक्षामधून उडी मारण्याचाही प्रयत्न

SCROLL FOR NEXT