varvara rao
varvara rao sakal media
मुंबई

Elgar Parishad : वरवरा राव यांना हायकोर्टाचा तात्पुरता दिलासा

सुनिता महामुनकर

मुंबई : एल्गार परिषद प्रकरणातील (Elgar Parishad Case) आरोपी कवी वर्वरा राव (varavara rao) यांनी 18 नोव्हेंबर पर्यंत तळोजा कारागृहात (Taloja Jail) शरण येऊ नये, असा दिलासा मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) मंगळवारी दिला.

राव यांनी जामीन अवधी वाढविण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात केली आहे. याचिकेवर न्या नितीन जामदार आणि न्या सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. राव (82) यांना वैद्यकीय कारणांमुळे सहा महिन्याचा जामीन फेब्रुवारीमध्ये मंजूर झाला आहे. त्यामुळे त्यांना सप्टेंबरमध्ये शरण येणे आवश्यक होते.

मात्र हा अवधी वाढवून मिळावा आणि मुंबई सोडून हैदराबादला मूळ गावी जाण्याची परवानगी द्यावी, कारण मुंबईमधील राहणीमान परवडत नाही, असे त्यांनी अर्जात म्हटले आहे. एनआयएच्या वतीने त्यांच्या जामिनाला विरोध करण्यात आला आहे. राव यांना गंभीर आजार झाला आहे, असे वैद्यकीय अहवालात नमूद केले नाही, त्यामुळे त्यांना जामीन अवधी वाढवून देऊ नये, अशी मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT