कल्याण-डोंबिवली पालिका  sakal
मुंबई

Mumbai : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात 'आपला दवाखाना';महाराष्ट्र दिनी होणार शुभारंभ

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने मुंबईतील विविध प्रभागांमध्ये यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - राज्य सरकारने मुंबईसह राज्यभरात 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' ही योजना सुरू केली. मुंबईनंतर आता ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महापालिकेत आपला दवाखाना महाराष्ट्र दिनी सुरू करण्यात येणार आहे.

तसेच केडीएमसी हद्दीत 9 मे ला 4 नविन आरोग्यवर्धीनी केंद्रे देखील सुरु होणार आहेत. यामुळे शहरातील नागरिकांना मोफत उपचार व विविध आरोग्य सुविधा या रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभर या दवाखान्यांची व्याप्ती वाढविण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार केडीएमसी हद्दीत देखील हा उपक्रम सुरू होणार आहे.

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने मुंबईतील विविध प्रभागांमध्ये यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या

'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' ठाणे जिल्हयातील कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत सुरु होणार आहे. महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने आपला दवाखान्याचे लोकार्पण करण्यात येणार

असल्याची माहिती केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी दिली. कल्याण पश्चिमेतील तळमजला, तारांगण बिल्डींग, वायले नगर, येथे 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' सुरु करण्यात येणार आहे. सदर दवाखान्यामधे बाहयरुग्ण विभाग असणार आहे. तसेच असांसर्गिक रोग नियंत्रण कार्यक्रम, लसीकरण, माताबाल संगोपन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच बाह्य

संस्थेद्वारे रक्त व लघवीच्या तपासण्या करण्यात येणार आहे. या दवाखान्यामुळे जवळच्या परिसरातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याचे उपआयुक्त डॉ. सुधाकर जगताप यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT