मुंबई : पश्चिम उपनगरातील महापालिकेचे विलेपार्ले पश्चिम येथील डॉ.आर. एन. कूपर रुग्णालय (Kupar hospital) लवकरच कात टाकणार आहे. या रुग्णालयात कॅथलॅब (cath lab), नेफ्रोलॉजी (Nephrology), बर्न युनिटसह अत्याधुनिक शवागार सुविधा (Ultra-Modern Mortuary Facility) उपलब्ध होणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला रुग्णांना या सुविधा मिळण्याची शक्यता आहे.
रुग्णालयात परिपूर्ण कॅथ लॅब, सुसज्ज बर्न युनिट, नेफ्रोलॉजी आणि शवागार बनवण्यात येणार आहे. त्याशिवाय डीएनबी, सीपीएस पोस्ट ग्रॅज्युएटच्या जागा आणि सुपरस्पेशालिटीच्या जागा अद्याप प्रलंबित आहेत, त्याही भरण्यात येणार आहेत. रुग्णालयात नवीन इमारत निर्माण करण्यात आली असून या नवीन इमारतीमध्ये या नवीन सुविधा दिल्या जाणार आहेत.
रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी कॅथ लॅब 2022 च्या जानेवारीपूर्वी कार्यान्वित करण्याचे सांगितले .तसेच येथील शवविच्छेदन केंद्र महाराष्ट्र शासनाकडून मुंबई महापालिकेला सुपूर्द करण्याबाबत काही समस्या आहेत.त्या सोडवण्यावर भर देणार असल्याचे ही ते म्हणाले. कूपर रुग्णालय हे पश्चिम उपनगरातील अत्यंत महत्वाचे रुग्णालय ठरले आहे. तेथील रुग्णांची वाढती गर्दी लक्षात घेता माजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी रुग्णालयाला भेट देऊन चर्चा केली. गेल्या पाच वर्षात या सुविधांची पूर्तता झाली नाही याबाबत ही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
यावेळी डॉ.दीपक सावंत यांनी पोस्ट मॉर्टम कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनासाठी प्रस्ताव पाठविण्याची विनंती केली. तसेच जखमा धुण्यासाठी व ड्रेसिंग करण्यासाठी बर्न युनिट आवश्यक आहे. बर्न युनिट आणि ड्रेसिंगसाठी बर्न वॉर्डमध्ये ठेवण्याची त्यांनी विनंती केली. वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे .यासाठी केंद्र सरकारची मदत आवश्यक आहे. त्यामुळे पदव्युत्तर जागा कमी आहेत. तसेच सिव्हील इंजिनीअर इलेक्ट्रीकल इंजिनीअर कमी आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले. कुपर हॉस्पिटलमधील प्रलंबित सुविधा मार्गी लगाल्यातर पश्चिम उपनगरातील नागरिकांना आणि रूग्णांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.