kidnapped sakal
मुंबई

Mumbai Kidnapping : बनावट बंदुकीचा वापर करुन हॉटेल मालकाचे अपहरण

मुंबईतील हॉटेल मालकाचे सोमवारी दुपारी अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी परिसरातून चार अज्ञात संशयितांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबईतील हॉटेल मालकाचे सोमवारी दुपारी अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी परिसरातून चार अज्ञात संशयितांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मुंबई - मुंबईतील हॉटेल मालकाचे सोमवारी दुपारी अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी परिसरातून चार अज्ञात संशयितांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अपहरणकर्त्यांनी बनावट'एअरगन' वापरून हॉटेल मालकाचे अपहरण केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस आणि गुन्हे शाखेने घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी संशयितांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली असून हॉटेल मालकाचा शोध सुरू आहे.

अंधेरी पूर्व येथील चकाला येथील हॉटेल वीरा रेसिडेन्सीमध्ये सोमवारी दुपारी अडीच ते साडेतीन वाजेच्या दरम्यान अपहरणाची घटना घडली. हॉटेलमधून पोलिसांना एअरगनची प्लास्टिकची काडतूस देखील सापडली आहे. अपहरण करणाऱ्या चार संशयितांचा हॉटेलच्या मालकाशी जोरदार वाद झाला आणि नंतर त्यांनी त्याला धमकी देण्यासाठी बनावट एअरगनचा धाक दाखवला. त्यानंतर त्यांनी मालकाला कारमध्ये बसवले. या गोंधळादरम्यान संशयितांनी हॉटेलबाहेर हवेत गोळीबारही केला. पोलिसाना हॉटेल मालक आणि अज्ञात संशयितांमध्ये पैशांवरून वाद झाला असल्याचा संशय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात मोठी उसळी! सेन्सेक्स 1,100 अंकांनी वाढला, निफ्टी 23,900 पार; सेन्सेक्स-निफ्टीत अचानक वाढ का?

शांतता कराराची घोषणा पण ट्रम्पसमोर इराणच्या ३ मोठ्या अटी, अमेरिका-इराण डीलमध्ये १४ मुद्दे महत्त्वाचे

Fifa World Cup 2026: ब्राझीलला बरोबरीचेच समाधान; मोरोक्कोसमोर पाच वेळच्या विजेत्यांचा कस, व्हिनिसियसच्या गोलने दिलासा

Pune Solapur Highway Traffic : पुणे-सोलापूर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, वाहनांच्या ६ किलोमीटरपर्यंत रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल

Latest Marathi News Live Update : पुण्यात आजपासून पाणी कपात

SCROLL FOR NEXT